वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कोची : इडुक्की जिल्ह्यातील इडाथट्टू आणि कन्नडिपारा भागात वनस्पतीच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. मनकुलम जंगलभागात सापडलेल्या या वनस्पतीला इम्पॅटिअन मनकुलामेन्सिस असे नाव देण्यात आले आहे. विभागीय वनअधिकारी बी. नागराज यांनी सर्वप्रथम जुलै 2015 मध्ये या वनस्पतीचा शोध लावला होता.

इम्पॅटिअन श्रेणीतील ही वनस्पती नवी असल्याचे त्या वेळी नागराज यांनी सांगितले होते, या कामात त्यांना संशोधक के. एम. प्रभुकुमार यांची मदत लाभली होती. 2016च्या सप्टेंबरमध्ये कन्नडिपारा येथे ही वनस्पती पुन्हा आढळली, जगासाठी मात्र ती अनोळखी वनस्पतीच होती. आता आंतरराष्ट्रीय जनरल फायटोटाक्‍सामध्ये याबाबतचे शोधपत्र छापून आले असून, या वनस्पतीची 100 ते 150 झाडेच सापडली असल्याने तिला अतिशय चिंताजनक श्रेणीत दाखल करण्यात आले आहे.

ही वनस्पती दगडांमध्ये असलेल्या ओलाव्यात वाढते, तिला जुलै ते ऑक्‍टोबर दरम्यान फुले येतात आणि ती पांढरी असून, त्यांच्यावर गुलाबी रंगाची हलकी छटा असते, अशी माहिती या शोधपत्रात देण्यात आली आहे.

Web Title: new species of tree found