झेप्टोसेकंद : वेळेचा सर्वात लहान भाग मोजण्यात शास्त्रज्ञांना यश!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

सेकंदाच्या अब्जावधी भागांचे पुन्हा खर्व (ट्रीलीयन) भाग म्हणजे झेप्टोसेकंद होय. झेप्टोसेकंद अंकात लिहायचा ठरला, तर दशांश चिन्हानंतर 20 शून्य दिल्यानंतर एक लिहावा लागले.

पुणे : वेळेची आजवरची सर्वांत छोटी गणना करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. दोन हायड्रोजन अणूमधून प्रकाश किरणाला पार होण्यासाठी लागणारा वेळ शास्त्रज्ञांनी अचूक मोजला आहे. प्रथमच झेप्टोसेकंदापर्यंतची सर्वांत छोटी वेळ मोजण्यात आली आहे. क्ष किरणाच्या वापरातून इतकी छोटी वेळ मोजण्याचे हे संशोधन 'सायन्स' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 

जर्मनीतील गोथे विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. रेनहार्ड डर्नर यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले. हॅम्बर्ग येथील कण प्रवेगक 'डॉट्‌स इलेक्‍ट्रॉन सिंक्रोट्रॉन'च्या माध्यमातून क्ष-किरणाच्या साहाय्याने वेळेची अचूक गणना करण्यात आली आहे. या आधी 2016 मध्ये लेझर किरणांच्या माध्यमातून झेप्टोसेकंदमध्ये मोजमाप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 

शेतकऱ्यांनो, ही बातमी तुमच्यासाठी; आता शेतीच्या नुकसानीची माहिती द्या कागदपत्रांशिवाय!​

काय आहे झेप्टोसेकंद :
सेकंदाच्या अब्जावधी भागांचे पुन्हा खर्व (ट्रीलीयन) भाग म्हणजे झेप्टोसेकंद होय. झेप्टोसेकंद अंकात लिहायचा ठरला, तर दशांश चिन्हानंतर 20 शून्य दिल्यानंतर एक लिहावा लागले. इतका हा अंक छोटा आहे. 

कशी गेली गणना? 
एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन मिळून हायड्रोजन अनु तयार होतो. शास्त्रज्ञांनी वेळेच्या मापणासाठी हायड्रोजन रेणूची (मॉल्यूक्‍यूल) अर्थात दोन हायड्रोजनच्या अणूंची निवड केली. रेणूमधील इलेक्‍ट्रॉनवर आदळून बाहेर पडेल इतकीच ऊर्जा असलेला फोटॉन त्यांनी क्ष-किरणांच्या माध्यमातून मिळवला. जेव्हा प्रत्यक्ष फोटॉन रेणूंवर सोडण्यात आला, तेव्हा तो एका इलेक्‍ट्रॉनवर आदळून दुसऱ्या इलेक्‍ट्रॉनवर आदळत गेला.

(छायाचित्रे स्रोत : गुगल)

ज्याप्रमाणे आपण तळ्यातील पाण्याच्या पृष्ठभागावर आडवा दगड फेकून 'भाकऱ्या' तयार करतो. अशाच प्रकारे हायड्रोजनच्या इलेक्‍ट्रॉनवर फोटॉन आदळत बाहेर पडला. यातून निर्माण झालेल्या 'इंटरफेरन्स पॅटर्न'चे (पाण्यावरील भाकऱ्यांच्या वलयाप्रमाणे) मोजमाप 'कोल्ड टार्गेट रिकॉईल आयन मोमेंटम स्पेक्‍ट्रोस्कोपी' या सूक्ष्मदर्शिकेच्या साहाय्याने करण्यात आले. फोटॉनला पहिल्या अणूपासून दुसऱ्या अणूपर्यंत पोचण्याचा कालावधी भौतिकशास्त्राच्या माहितीच्या आधारे मोजण्यात आला. तर तो 247 झेप्टोसेकंद होता. या घटनेतून अणूमधील प्रकाशाच्या वेगाचेही मापन करता आले. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन परीक्षेचा सराव करता येणार फ्रीमध्ये!​

रेणूंमधील इलेक्‍ट्रॉन एकाचवेळी प्रकाशाच्या किरणाशी अभिक्रिया करत नसल्याचे प्रथमच निरीक्षणातून समोर आले आहे. रेणूंमधूनही माहितीच्या वहनाला विलंब होतो. कारण रेणूंमधील माहिती केवळ प्रकाशाच्या वेगानेच पसरते. 
- डॉ. रेनहार्ड डर्नर, मुख्य संशोधक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New world record in short time measurement

Tags
टॉपिकस
Topic Tags: