निसान ‘मॅग्नाईट’ची नेपाळ, इंडोनेशिया, आफ्रिकेत निर्यात

निसान इंडियाने १५ हजार १० मॅग्नाईट कारची निर्मिती केली.
निसान ‘मॅग्नाईट’ची नेपाळ, इंडोनेशिया, आफ्रिकेत निर्यात

मुंबई : निसान इंडियाने nissan india ‘मॅग्नाइट’ magnite कारची इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि नेपाळमध्ये निर्यात करण्याची घोषणा केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये बाजारात आल्यापासून मे २०२१ अखेरपर्यंत निसान इंडियाने १५ हजार १० मॅग्नाईट कारची निर्मिती केली. ज्यात भारतासाठी १३ हजार ७९० आणि १ हजार २२० निर्यातीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. (nissan-india-starts-export-of-new-magnite-to-nepal-indonesia-and-south-africa-details)

निसान मॅग्नाइटला ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ या संकल्पनेवर तयार करण्यात आले आहे. या नवीन एसयूव्हीला नेपाळच्या बाजारातही मागणी आहे. नेपाळमध्ये फेब्रुवारी २०२१ ला मॅग्नाईट लाँच झाल्याच्या ३० दिवसांत ७६० हून अधिक बुकिंग नोंदवण्यात आल्या. नेपाळमध्ये मासिक प्रवासी वाहन विक्री सुमारे १ हजारे ५८० युनिट इतकी आहे.

मॅग्नाईटची वैशिष्ट्ये -

१) मॅग्नाईटमध्ये एअर प्युरीफायर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, एम्बिएंट लाईटिंग, क्रूझ कंट्रोल, ३६० डिग्री कॅमेरा आणि ८.० इंचीचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम (अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्ले कनेक्टिविटी) आदी फिचर्स देण्यात आले आहेत.

२) कारमधील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एयरबॅग, रिअर पार्किंग सेंसर, ईबीडीसह एबीएस कंट्रोल, हिल लॉन्च कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल यासारखे फिचरही देण्यात आले आहेत.

३) मॅग्नाईट चार ड्युअल टोन आणि चार मोनोटोन पेंट स्किम्समध्ये उपलब्ध आहे. मोनोटोन शेड्समध्ये ब्लॅक-सिल्वर, ऑनेक्स ब्लॅक, सँडस्टोन ब्राऊन आणि स्टॉर्म व्हाईट आदी रंगांचा समावेश आहे. तर ड्यूल टोन कलरमध्ये फ्लेअर गार्नेट रेडसह ऑनेक्स ब्लॅक, टर्मालाईन ब्राऊन-ऑनेक्स ब्लॅक, पर्ल व्हाईट-ऑनेक्स ब्लॅक रंगातही ही कार उपलब्ध आहे.

४) मॅग्नाईटमध्ये अराऊंड व्ह्यु मॉनिटर (AVM) आणि फुल ७ इंचीचा टीएफटी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर बिल्ट-इन टायर प्रेशर मॉनिटर आणि वेलकम अॅनिमेशनही मिळणार आहे. तसेच वायरलेस अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो आणि बिल्ट-इन व्हॉईस रेकग्निशनही कारमध्ये असणार आहे.

५) मॅग्नाईटमध्ये ‘निस्सान कनेक्ट’ टेक्नॉलजीही देण्यात आली आहे, ज्यात ५० हून अधिक फिचर्स आहेत. मँग्नाईटच्या टॉप मॉडेलमध्ये कस्टम 'टेक पॅक'ही आहे. ज्यात जेबीएलचे दमदार स्पीकर्स, पॅडल लॅम्प आणि एलसीडी स्कफ प्लेट मिळते.

संपादन : शर्वरी जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com