ट्रिपल Camera सह Nokia 6.2 भारतात लाँच!

वृत्तसंस्था
Sunday, 13 October 2019

एचएमडी ग्लोबलने भारतात आपला नवा Nokia 6.2 स्मार्टफोन लाँच केला.

नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबलने भारतात आपला नवा Nokia 6.2 स्मार्टफोन लाँच केला. कंपनीने मागील महिन्यात IFA 2019 दरम्यान Nokia 6.2  आणि Nokia 7.2 हे दोन फोन्स आणले होते. यापूर्वी Nokia 7.2 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. त्यानंतर आता ट्रिपल कॅमेराचा Nokia 6.2 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आला आहे. 

भारतात या स्मार्टफोनच्या लाँचिंगचा टीजरही Amazon वर दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता त्याची किंमतही समोर आली आहे. Nokia 7.2 च्या तुलनेने Nokia 6.2 स्वस्त आहे. 

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स

- सिम : ड्युअल सिम (नॅनो)

- अँड्रॉइड : 9 पाय

- डिस्प्ले : 6.3 इंच फुल HD+

-  रॅम : 4 GB 

Image may contain: phone

- प्रोसेसर : ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 

- बॅटरी : 3500mAh

-  कॅमेरा : Triple Camera 

  - Primary Camera :   16MP 

  - Camera : 5MP आणि 8MP

  - Front Camera : 8 MP

- Internal Storage : 64 GB 

- Expandable Memory : 512GB 

- किंमत : 4GB + 64GB 15, 999 रुपये.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nokia 6 point 2 Launch in India Today