Nokia G11 Plus Launched: तीन दिवस चालते बॅटरी, कमीतही बजेटमध्ये! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nokia g11 plus with three days battery life launched in india know price

Nokia G11 Plus Launched: तीन दिवस चालते बॅटरी, कमीतही बजेटमध्ये!

नोकिया ब्रँडिंगसह एक नवीन स्मार्टफोन एचएमडी (HMD) ग्लोबलने भारतात लॉन्च केला आहे आणि कंपनीने तो बजेट सेगमेंटमध्ये आणला आहे. नवीन Nokia G11 Plus स्मार्टफोनमध्ये मोठ्या 6.5-इंच डिस्प्ले व्यतिरिक्त, तीन दिवसांपर्यंतची बॅटरी बॅकअप देईल असे सांगण्यात आले आहे.

कंपनीने गेल्या आठवड्यात 7 ऑक्टोबरपासून भारतात Nokia G11 Plus ची विक्री गुपचूप सुरू केली. ग्राहकांना हा फोन लेक ब्लू आणि चारकोल ग्रे कलर पर्यायांमध्ये हे खरेदी करता येणार आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या या फोनच्या एकमेव व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे.

नोकिया फोनचे फीचर्स

नवीन नोकिया डिव्हाइसमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले HD + रिझोल्यूशन (720x1600 पिक्सेल) सह 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह दिली आहे. पातळ बेझल्स असलेल्या या डिव्हाइसमध्ये सेल्फी कॅमेरासाठी वॉटर-ड्रॉप नॉच आहे आणि त्याला Unisoc T606 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे.

हेही वाचा: Airtel 5G Plus vs Jio True 5G: कोणती कंपनी देतेय टॉप 5G स्पीड? येथे पाहा शहरांची यादी

50MP कॅमेरा

Nokia G11 Plus ला मागील पॅनलवर ऑटो-फोकस सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा सेन्सर मिळेल, तर 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध असेल. त्याच वेळी, फ्रंट पॅनलवर 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Android 12 सह येणाऱ्या या फोनला दोन मोठे Android अपडेट मिळतील. फोनमध्ये 10W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Nokia T10 टॅबचा LTE व्हेरिएंटही लॉंच

कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या Nokia T10 टॅबलेटचा LTE व्हेरिएंट देखील लॉन्च केला आहे. त्याच्या 3GB + 32GB व्हेरिएंटची किंमत 12,799 रुपये आहे, तर 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे आणि 15 ऑक्टोबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल . हा टॅबलेट 8 इंच डिस्प्ले, 8MP कॅमेरा आणि मोठी बॅटरीसह येतो.

हेही वाचा: 5G in India: 'या' 116 स्मार्टफोन्सना Airtel 5G करेल सपोर्ट, तुमचा फोन यादीत आहे का?

टॅग्स :Nokia