esakal | पेन्शनधारकांना बँकांकडून थेट WhatsApp वर मिळणार पेन्शन स्लिप
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Update

पेन्शनधारकांना बँकांकडून थेट WhatsApp वर मिळणार पेन्शन स्लिप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

व्हॉट्सअ‍ॅप हे बर्‍याच लोकांसाठी एक फायदेशीर आणि आवश्यक अ‍ॅप बनले आहे, लवकरच यात आणखी एक मोठे फीचर जोडले जाणार आहे, ज्यामुळे लोकांच्या पैशाशी संबंधित ही सेवा मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) आणि आपल्या स्मार्टफोनवर येत असलेले नवीन अपडेट हे निवृत्तीवेतनाशी (pension) संबंधित आहे. (now-pensioners-get-pension-slip-from-banks-also-through-whatsapp)

सरकारने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन स्लिप पाठविण्यासाठी नवीन सुविधा जाहीर केली आहे. जी आतापर्यंत केवळ एसएमएस आणि ईमेलपुरती मर्यादीत आहे, संबंधित विभागाच्या वतीने व्हॉट्सअ‍ॅपवरुन पेन्शन स्लिप पाठविली जात असून ही सुविधा ईमेलपेक्षा नक्कीच सोपी आहे. बरेच लोक त्यांचे SMS पहायला विसरतात. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या बाबतीत मात्र तसे नाही, लोक सर्रास व्हॉट्सअ‍ॅप वापरतात.

ही सुविधा केंद्र सरकारच्या आग्रहावरून आमलात आणली जात आहे. त्या अंतर्गत बँकांना पेन्शनधारकांना त्यांच्या खात्यात पेन्शन जमा झाल्याची माहिती देण्यासाठी एसएमएस व ईमेलसह व्हाट्सएपसारख्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. निवृत्ती वेतन व पेन्शनर्स कल्याण विभागाच्या आदेशात म्हटले आहे की, एका अधिकाऱ्यानुसार निवृत्तीवेतनांच्या खात्यात जमा झाल्यानंतर पेन्शन स्लिप पाठविण्यासाठी केंद्राने बँकांना एसएमएस व ईमेलसह व्हाट्सएपसारख्या सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा: आता WhatsApp वर डिलीट केलेले मेसेजही वाचा, 'हा' आहे मार्ग

सरकारी आदेशानुसार सर्व पेन्शन वितरित करणाऱ्या बँकांनी पेन्शनधारकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर SMS व Email द्वारे पेन्शन जमा केल्यानंतर पेन्शन स्लिप (Pension Slip) देतील. आयकर भरणा, महागाई सवलत देय आणि डीआर थकबाकी या संदर्भात निवृत्तीवेतनधारकांना मासिक पेन्शनची ब्रेकअप माहिती पुरविणे आवश्यक आहे, असे या आदेशात म्हटले आहे. पेन्शन स्लिपमध्ये मासिक पेन्शन भरलेली रक्कम, जमा केलेली रक्कम आणि कर वजा वगैरेचा संपूर्ण तपशील असावा असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, पेंनशनधारकांच्या बाबतीत ही निश्चितपणे एक आवश्यक सेवा आहे.

(now-pensioners-get-pension-slip-from-banks-also-through-whatsapp)

हेही वाचा: दोनच टॅपमध्ये डिलीट होणार गुगल सर्च हिस्ट्री

loading image