
Ola Electric : ओलाची जबरदस्त एक्सचेंज वीकेंड ऑफर, भन्नाट फायदे वाचून तुम्हीही व्हाल अवाक...
Ola Electric : इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता ओला इलेक्ट्रिकने नवीन ग्राहकांना ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रोकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने एक्सचेंज वीकेंड ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने ट्विटर पोस्टद्वारे ऑफरची घोषणा केली आणि पोस्टमध्ये लिहिले की, "हा वीकेंडचा प्लॅन आहे. ओला एक्सपिरियन्स सेंटरमध्ये या, तुमची पेट्रोल टू-व्हीलर सोडा आणि झिरो एक्स्ट्रा कॉस्टसह भारताच्या नंबर 1 ई-टू-व्हीलर राइडचा आनंद घ्या.
ऑफर फक्त दोन दिवसांसाठी आहे
Ola ची ही वीकेंड ऑफर फक्त 18 मार्च आणि 19 मार्च साठी उपलब्ध आहे. याद्वारे ग्राहकांना 10,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभही मिळू शकतो. कंपनीच्या ट्विटर पोस्टनुसार, ही ऑफर देशातील निवडक शहरांमध्ये उपलब्ध असेल, परंतु या शहरांची नावे देण्यात आलेली नाहीत.
एक्सचेंज डिस्काउंट मिळेल
Ola Electric च्या अधिकृत वेबपेजवर माहिती देण्यात आली आहे की उर्वरित भारतासाठी एक्सचेंज बोनसचा लाभ ₹ 5,000 असेल. दुसरीकडे, ज्या ग्राहकांना त्यांची सध्याची पेट्रोल टू व्हीलर बदलायची आहे त्यांना 45,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो.

किंमत आणि कलर ऑप्शन
Ola S1 Pro ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपये आहे, जी अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये पोर्सिलेन व्हाइट, खाकी, निओ मिंट, कोरल ग्लॅम, जेट ब्लॅक, मार्शमॅलो, लिक्विड सिल्व्हर, मिलेनियल पिंक, अँथ्रेसाइट ग्रे, मिडनाईट ब्लू आणि मॅट ब्लॅक यांचा समावेश आहे.
पॉवरट्रेन
Ola S1 Pro ई-स्कूटरची रेंज प्रति चार्ज 170 किमी पर्यंत असल्याचा दावा केला जातो. ही स्कूटर केवळ 2.9 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग गाठू शकते. या स्कूटरची बॅटरी चार्जिंग टाइम 6.5 तास आहे. यात इको, नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर सारखे ड्रायव्हिंग मोड मिळतात.
Ola S1 ची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. ही स्कूटर केवळ 3.6 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग गाठण्यास सक्षम आहे. त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. स्कूटरमध्ये बसवलेली मोटर जास्तीत जास्त 8.5 किलोवॅट पॉवर निर्माण करते. याची रेंज 121 किमी प्रति चार्ज आहे. दोन्ही प्रकारांमध्ये 3.92 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे.
कंपनी फ्रंट फोर्क रिप्लेसमेंट करेल
ओलाने अलीकडेच ट्विटरवर त्यांच्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रंट फोर्क्स मोफत बदलण्याची घोषणा केली. ग्राहक या ओला अनुभव केंद्रावर मोफत अपग्रेड करू शकतील, ज्यासाठी 22 मार्च 2023 पासून अपॉइंटमेंट बुकिंग सुरू होईल.