ओला इलेक्ट्रिक देशात नंबर एक वर; पाच महिन्यात टाकले हिरो इलेक्ट्रिकला मागे

ओलाला भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये येऊन फक्त ५ महिने झाले असून या पाच महिन्यात लोकांनी ओला इलेक्ट्रिकला प्रचंड मोठा प्रतिसाद दिलाय.
Ola Electric
Ola Electricsakal

ओला इलेक्ट्रिकने देशातील नंबर १ इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपनी बनली आहे. विशेष म्हणजे ओला इलेक्ट्रिकने हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकले आहे. ओलाला भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये येऊन फक्त ५ महिने झाले असून या पाच महिन्यात लोकांनी ओला इलेक्ट्रिकला प्रचंड मोठा प्रतिसाद दिलाय. (Ola Electric grabbed the top spot in the Indian electric two-wheeler market by beating Hero Electric.)

गेल्या काही दिवंसापासून ओलाच्या अनेक स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडली होत्या, त्यामुळे ओलाला बरंच ट्रोलींग सहन करावे लागले असं असतानाही ओलाने विक्रीमध्ये सर्वांना मागे टाकलंय.

Ola Electric
एलॉन मस्कचे अर्ध्याहून अधिक ट्विटर फॉलोअर्स फेक; ऑनलाइन टूलचा दावा

एप्रिल महिन्यात हिरो इलेक्ट्रिकच्या विक्रीत ५० टक्के इतकी घसरण झाली असून ओलाने १२६८३ युनिट्सची विक्री करत प्रथम क्रमांक पटकवला.

भारतात वेगाने हातपाय पसरवत असलेली इलेक्ट्रीक टू-व्हीलर कंपनी Ola Electric (ओला इलेक्ट्रिक) ने तेवढ्याच वेगाने पैसे जमा केले आहेत. कंपनीने 1,490.5 कोटी रुपयांची गुतंवणूक मिळविल्याची घोषणा केली आहे.

Ola ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Falcon Edge, SoftBank आणि इतरांकडून आणखी $200 दशलक्षची गुंतवणूक झाल्याची घोषणा केली होती. यानंतर ओला इलेक्ट्रिकचे बाजारमूल्य अंदाजे 3 अब्ज डॉलर झाले होते. ओला इलेक्ट्रिकने यापूर्वी टायगर ग्लोबल आणि मॅट्रिक्स इंडिया सारख्या इतर गुंतवणूकदारांकडून निधी उभारला होता.

Ola Electric
सॅमसंगचा बंपर सेल! फोन, टीव्ही आणि स्मार्ट वॉचवर मिळतेय भन्नाट सूट

गेल्या वर्षी जुलैमध्ये ओला इलेक्ट्रिकने बँक ऑफ बडोदासोबत 10 वर्षांचा कर्ज वित्तपुरवठा करार जाहीर केला होता. हा निधी अशा वेळी आलाय जेव्हा ओला इलेक्ट्रिक त्याच्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत होते. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे. तर S1 Pro ची किंमत 1.30 लाख रुपये आहे. निधीमुळे ओलाच्या 'फ्यूचरफॅक्टरी'ची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या प्लांटमध्ये 10,000 पेक्षा जास्त महिला कार्यरत आहेत आणि जागतिक स्तरावर केवळ महिलांसाठी असलेल्या सर्वात मोठ्या कारखान्यांपैकी एक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com