एकाच दिवशी ६०० कोटींच्या Ola Electric स्कूटर्सची विक्री

ओला इलेक्ट्रिक स्कूटर
ओला इलेक्ट्रिक स्कूटर

नवी दिल्ली - ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric Scooter) गुरुवारी (ता.१६) घोषणा केली, की तिने बुधवारी एकाच दिवशी ६०० कोटी रुपयांचे ई-स्कूटर (e-scooter) विकले आहेत. सहाशे कोटींपेक्षा अधिक रुपयांचे स्कूटर विकले आहे. दुचाकी उद्योगात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे युग आले आहे, असे कंपनीने म्हटले आहे. इलेक्ट्रिक स्कूटरने पहिल्या २४ तासाच्या आता विक्रीचा विक्रम तोडला. तसेच नुकतेच एक लाख नोंदणी करुन विक्रम नोंदविला आहे. त्यामुळे जगात सर्वत्र बुकिंग मिळणारी पूर्व नोंदणी (प्री-बुक्ट) स्कूटर ती बनली आहे. ओला इलेक्ट्रिकने १५ जुलै रोजी संध्याकाळी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंगला सुरुवात केली होती.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर
'जनधन'मुळे सर्वसामान्य आर्थिक साक्षर, निर्मला सीतारमन यांचे मत

ओला एस १ आणि एस १ प्रो ला एक महिन्यानंतर १५ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आले होते. खरेदी प्रक्रियेविषयी बोलाल तर, यात रंग आणि प्रकाराची निवड करणे, कर्जाची निवड करणे, आगाऊ रक्कम भरणे आणि डिलिव्हरीची तारीख मिळवणे आदींचा समावेश आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळण्यास ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होईल. खरेदीदाराला ७२ तासांमध्ये मिळण्याची तारीख कळविली जाईल. ओला एस १ ची किंमत ९९ हजार ९९९ रुपये, तर एस १ प्रो माॅडलची किंमत एक लाख २९ हजार ९९९ (एक्स शोरुम फेम २ सब्सिडसह आणि राज्य सबसिडी सोडून) आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर
MG Astor SUV कार भारतीय बाजारात दाखल

ओला एस १ ची वैशिष्ट्ये

- ओला एस १ इलेक्ट्रिक स्कूटर ३.९ केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरीपॅकचा उपयोग केला आहे. जे ११ बीएचपी इलेक्ट्रिक मोटार पाॅवर देते.

- या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड नाॅर्मल, स्पोर्ट आणि हायपर देण्यात आले आहे. दुसरीकडे चार्जिंग टाईम पाहिले तर पारंपरिक एसी चार्जरने बॅटरी ६ तासांमध्ये चार्ज होऊन जाते. ती ११५ प्रतितास किलोमीटर वेगाने चालविता येईल.

- या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड नाॅर्मल, स्पोर्ट आणि हायपर देण्यात आले आहेत.

- ते रिव्हर्स गिअर, सेग्मेंटचे बेस्ट अंडर सीट स्टोरेज, नॅव्हिगेशव आणि कूज कंट्रोलसारखे फीचर्ससह येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com