लवकरच भारतात लॉंच होणार OnePlus 10 Pro; पाहा काय असेल किंमत-फीचर्स

oneplus 10 pro india launch date tipped here is what to expect
oneplus 10 pro india launch date tipped here is what to expect

येत्या आठवड्यात OnePlus 10 Pro भारतात लॉन्च होणार आहे. याबाबत कंपनीचे सीईओ पीट लाऊ यांनी अलीकडेच घोषणा केली की कंपनी लवकरच Oneplus 10 Pro ला युरोप आणि भारतासारख्या अधिक बाजारपेठांमध्ये आणण्याची तयारी करत आहे. अद्याप लॉंचची तारखेची घोषणा केली नसली तरी, टिपस्टर योगेश ब्रार यांच्या दाव्यानुसार येत्या 22 मार्च किंवा 24 मार्च रोजी हा फोन भारतात लॉंच होऊ शकते.

OnePlus 10 Pro हे ब्रँडचे फ्लॅगशिप फोन आहे, जो चीनमध्ये आधीच उपलब्ध आहे. हा फोन क्वालकॉमच्या टॉप-एंड स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेटसह लॉन्च होणारा हा पहिला स्मार्टफोन होता. 80W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेल्या काही मोजक्या स्मार्टफोन्सपैकी हा एक आहे.

या लिकनुसार, या फोनच्या लॉन्चचे टीझर येत्या काही दिवसात येतील. दरम्यान OnePlus 10 Pro ची भारतातील किंमत 55,000 ते 60,000 रुपये दरम्यान असण्याची अपेक्षा व्यक्त कली जात आहे. हा डिव्हाइस चीनमध्ये सध्या CNY 4,699 मध्ये विकला जातो, जे रूपांतरित केल्यावर भारतात सुमारे 54,500 रुपये इतकी होते. OnePlus कदाचित वापरकर्त्यांना सॅमसंग आणि apple ने ऑफर केलेल्या फोनपेक्षा कमी किंमतीत फ्लॅगशिप फोन ऑफर करण्यासाठी कमी किंमतीत हा फोन लॉंच करु शकते.

oneplus 10 pro india launch date tipped here is what to expect
108MP कॅमेरासह रेडमीचे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉंच, पाहा डिटेल्स

OnePlus 10 Pro मध्ये QHD+ रिझोल्यूशन आणि 1300nits पीक ब्राइटनेससाठी सपोर्ट असलेला 6.7-इंच वक्र AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले 1Hz आणि 120Hz मधील रीफ्रेश रेट मिळेल. तसेच समोरचा भाग कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसने देखील संरक्षित केला आहे.

तसेच यामध्ये अंतर्गत स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर आहे. हे 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज दिले आहे. OnePlus मध्ये 5,000mAh बॅटरी मिळते. यात 50W वायरलेस चार्जिंग आणि 80W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. स्टिरिओ स्पीकर्सना डॉल्बी अॅटमॉसचा देखील सपोर्ट दिलेला आहे.

फोटोग्राफीसाठी, OIS सह 48-मेगापिक्सेल सोनी IMX789 कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल Samsung ISOCELL jN1 सेन्सरसह तिहेरी कॅमेरा सेटअप मिळतो. याला OIS सपोर्टसह 8-मेगापिक्सेल टेलीफोटो सेन्सर दिले आहे. सेटअपमध्ये 3.3X ऑप्टिकल झूमसाठी सपोर्टसह आहे 8K व्हिडिओ रेकॉर्ड करता येते.

oneplus 10 pro india launch date tipped here is what to expect
Realme चे 2 नवे फोन लॉंंच, किंमत 14,999 रुपयांपासून सुरू, पाहा फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com