OnePlus 10R कधी लॉंच होणार?, जाणून घ्या स्मार्टफोनबद्दल सर्वकाही


oneplus 10r everything leaked and best offer on oneplus 9r smartphone via amazon check deal details here
oneplus 10r everything leaked and best offer on oneplus 9r smartphone via amazon check deal details here

तुम्ही देखील OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकते. ब्रँडचा शक्तिशाली स्मार्टफोन OnePlus 9R वर सध्या बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. OnePlus 9R अजूनही Amazon वर 33,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. हा फोन मार्च 2021 मध्ये 39,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता.

Amazon ही ई-कॉमर्स साइट ग्राहकांना या प्रीमियम स्मार्टफोनवर 6,000 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय, तुम्ही 12,050 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळवू शकता, त्यानंतर तुम्ही हा फोन खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. जर बघितले तर, एक्सचेंज बोनस आणि डिस्काउंट या दोन्हींचा फायदा घेतला तर फोनची किंमत फक्त 15,949 रुपयांपर्यंत खाली येते, म्हणजेच 18,050 रुपयांची संपूर्ण बचत. परंतु लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसचे मूल्य तुमच्या सध्याच्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल.

OnePlus 9R की OnePlus 10R?

तुम्हाला OnePlus 9R विकत घ्यावा की OnePlus 10R ची वाट पहावी असा प्रश्न पडत असेल तर. जर तुम्हाला ते एक्सचेंज ऑफरसह 30,000 रुपयां पेक्षा कमी किमतीत मिळत असेल तर तो खरेदी करणे चांगले आहे. 30,000 रुपयांच्या आतील काही मिड-रेंज फोनच्या तुलनेत हा एकंदरीत चांगला परफॉर्मन्स देईल. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 चिप, एक AMOLED डिस्प्ले आणि शक्तिशाली 4500mAh बॅटरी मिळतो.परंतु, जे 35,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकतात आणि आणखी काही आठवडे वाट पाहू शकतात त्यांनी जुन्या मॉडेलऐवजी नवीन OnePlus 10R चा विचार करावा.

अर्थात, OnePlus 10R ची किंमत OnePlus 9R पेक्षा जास्त असेल. पण काही लीकनुसार या फोनसोबत एक चांगला कॅमेरा सेटअप, लेटेस्ट सॉफ्टवेअर, एक मोठा डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. नवीन मॉडेलमध्ये OnePlus 9RT ऑफर करत असलेलाच कॅमेरा सेटअप असू शकतो.


oneplus 10r everything leaked and best offer on oneplus 9r smartphone via amazon check deal details here
मुंबईत कोरोना रुग्णात वाढ; १७ मार्चनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्ण

OnePlus 10R भारतात कधी लॉन्च होईल?

OnePlus 10R लवकरच लॉंच होणार आहे आणि त्याचे लवकरच भारतात पदार्पण होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने घोषणा केली आहे की ती 28 एप्रिल रोजी एक नवीन कार्यक्रम आयोजित करणार आहे आणि टीझरनुसार OnePlus दोन फोन आणि वायरलेस इयरफोनचा एक नवीन सेट लॉन्च करू शकतो. टिपस्टर अभिषेक यादव दावा करत आहेत की, या इव्हेंटमध्ये OnePlus 10R, OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि Nord Buds TWS इयरफोन लॉन्च केले जातील.

OnePlus ने अद्याप स्मार्टफोनच्या नावाची अधिकृतपणे कन्फर्म केलेले नाही आणि फक्त त्याचा एक टीझर शेअर केला आहे. आत्तापर्यंतच्या लीक्सन्सार असे सूचित केले आहे की, त्यापैकी एक 10R मॉडेल असेल कारण Amazon ने चुकून आगामी OnePlus फोन स्पॉन्सर केला आहे, जो 10R असल्याचा दावा टिपस्टरने केला आहे. 91Mobiles असाही दावा करत आहे की OnePlus India चे CEO नवनीत नाकरा यांनी हेच डिव्हाईस MediaTek 8100 चीप सपोर्टसह येत असल्याचे संकेत दिले आहेत.


oneplus 10r everything leaked and best offer on oneplus 9r smartphone via amazon check deal details here
गुगल देणार 12 हजार लोकांना नोकरी; जाणून घ्या कंपनीचा संपूर्ण प्लॅन

टिपस्टर योगेश ब्रार यांनी दावा केला आहे की OnePlus 10R 120Hz रिफ्रेश रेटसह मोठ्या 6.7-इंच FHD+ E4 AMOLED डिस्प्लेसह येईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यात अलर्ट स्लाइडर असणार नाही. आतापर्यंत, कंपनीने हे फीचर प्रीमियम फोन्ससोबतच मूळ नॉर्ड सीरिजमध्ये सादर केले आहेत. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक नसल्याचे सांगितले जात आहे. डिव्हाइसमध्ये स्पीकर्स असतील.

OnePlus हँडसेट दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर करण्याचा निर्णय घेऊ शकते. एकामध्ये 150W चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी असू शकते, तर दुसऱ्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी असू शकते. हे कदाचित Android 12 OS सह लॉंच केले जातील

- वर नमूद केल्याप्रमाणे, OnePlus 10R मध्ये OnePlus 9RT सारखाच कॅमेरा सेटअप असेल. मागील बाजूस, OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. समोर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.


oneplus 10r everything leaked and best offer on oneplus 9r smartphone via amazon check deal details here
विजेचे संकट ओढवणार! विजेची मागणी ३८ वर्षांच्या उच्चांकावर

ही असेल भारतातील OnePlus 10R ची किंमत!

- OnePlus 10R ची भारतात किंमत सुमारे 40,000 रुपये असण्याची शक्यता आहे. OnePlus 9R मूळत: 39,999 रुपयांना देशात लॉन्च करण्यात आला होता आणि किंमत त्याच रेंजमध्ये असण्याची अपेक्षा आहे. ब्रँड आधीपासून OnePlus 9RT ची अधिक पावरफुल चिप 42,999 रुपयांना विकत आहे.

तसेच, असे सांगितले जात आहे की OnePlus 10R चीनमध्ये वेगवेगळ्या ब्रँडिंगसह येईल. कंपनी नवीन OnePlus Ace मालिका सादर करू शकते कारण ती चीनी सोशल मीडिया साइट Weibo पाहण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com