OnePlus ते Samsung चे 12GB रॅम असलेले सर्वोत्तम स्मार्टफोन

प्रमोद सरवळे
Wednesday, 18 November 2020

सॅमसंग ते वनप्लस आणि ओप्पोसारखे ब्रँडनी 12 जीबी रॅम असलेले फोन बाजारात आणले आहेत.

पुणे: सॅमसंग ते वनप्लस आणि ओप्पोसारखे ब्रँडनी 12 जीबी रॅम असलेले फोन बाजारात आणले आहेत. ग्राहक हे फोन खरेदी करू शकतात. या मोबाईलबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Samsung Galaxy S20 Ultra-
दक्षिण कोरियाचा ब्रँड सॅमसंगच्या शक्तिशाली Samsung Galaxy S20 Ultraमध्ये 12 जीबी रॅम ऑप्शन हा पर्याय मिळतो. गॅलेक्सी एस 20 अल्ट्राची सुरुवातीची किंमत 97,999 रुपये आहे. 6.9 इंचाचा डिस्प्ले आणि 5000 mAh बॅटरी असलेल्या या फोनला 40 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. मागच्या पॅनलला 108 + 12 + 48 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा मिळतो. या डिव्हाइसला 16 जीबी रॅमची सोय आहे.

Samsung Galaxy S20 Ultra (Cloud White, 12GB RAM, 128GB Storage) with No Cost EMI/Additional Exchange Offers

Asus ROG Phone 3-
गेमिंग स्मार्टफोन Asus ROG Phone 3 चे टॉप व्हेरीयंटमध्ये 12 जीबी रॅमची सोय आहे. याची किंमत 49,999 रुपये असून त्यात 6.59 इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनला 6000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि त्याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 64 + 13 + 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेटअप आहे.

SmartLike 21D 9H Full Glue Tempered Glass for Asus ROG Phone 3 ZS661KS 2020 Release

iQOO 3 5G-
2020 च्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या iQOO 3 5G- मध्ये 6.44 इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनच्या 12 जीबी रॅम असलेल्या व्हेरियंटची किंमत 44,990 रुपये आहे. फोनमध्ये 4370 mAh ची बॅटरी आहे आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर असलेल्या फोनला मागच्या पॅनलवर 48 + 8 + 13 + 2 मेगापिक्सलचा प्रायमरी क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो.

Amazon.com: Original IQOO 3 8G+128GB 5G Mobile Phone Snapdragon 865 AMOLED  6.44" Screen Android 10 180hz 4440mAh 55W Super Charger Global ROM UFS 3.1  48.0MP Cellphone by-(Real Star Technology) (Black 8+128): Electronics

Motorola Edge Plus-
मोटोरोलाने यावर्षी 6.7 इंचाचा वक्र डिस्प्ले असलेले शक्तिशाली फ्लॅगशिप डिव्हाइस लाँच केलं आहे. या फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेला एकमेव व्हेरिएंट 64,999 रुपये आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरी आहे. 25 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याव्यतिरिक्त यामध्ये 108 + 16 + 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप आहे.

Realme X50 Pro 5G-
Realme च्या   X50 Pro 5G मध्ये 12 जीबी रॅमचा पर्याय आहे. फोनच्या 12 जीबी रॅम व्हेरियंटची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये 6.44 इंचाचा डिस्प्ले आणि 4200 mAh बॅटरी आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आहे आणि 32 + 8 मेगापिक्सलड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागच्या पॅनलमध्ये 64 + 8 + 12 + 2 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

Oppo Find X2-
या फोनच्या 12 जीबी रॅम वेरियंटची किंमत 64,990 रुपये आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4260 mAh बॅटरी आणि 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. मागच्या पॅनलमध्ये 48 + 12 + 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OnePlus to Samsung best smartphones having more than 12 gb RAM