Online Fraud | एक छोटीशी चूक ज्येष्ठ दाम्पत्याला पडली महागात; गमवावे लागले ८.२४ लाख रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Fraud

Online Fraud : एक छोटीशी चूक ज्येष्ठ दाम्पत्याला पडली महागात; गमवावे लागले ८.२४ लाख रुपये

मुंबई : गुगल सर्चमध्ये केलेली एक चूक एका यूजरला चांगलीच महागात पडली आहे. या चुकीची भरपाई म्हणून त्याला तब्बल ८.२४ लाख रुपये गमवावे लागले आहे. ऑनलाइन फ्रॉडचे हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. (online fraud with senior citizen couple fraudsters remove 8.24 lakh from bank account)

नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडपे त्यांच्या डिश वॉशरसाठी कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधत होते. तिथे त्यांना एक नंबर सापडला जो आयएफबी कस्टमर केअरच्या नावाने नोंदणीकृत होता.

सध्या हा नंबर बंधन बँकेचा कस्टमर केअर नंबर म्हणून नोंदणीकृत आहे. या नंबरवर कॉल केला असता एका महिलेने फोन उचलला व तिने आपल्या वरिष्ठांकडे फोन दिला.

वरिष्ठ महिलेने फोन करणाऱ्या वृद्ध महिलेला एनीडेस्क हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यात आपली माहिती भरण्यास व १० रुपये भरून तक्रार दाखल करण्यास सांगितले.

या दरम्यान अनेकदा त्यांचा फोन कट झाला व समोरील महिलेने तिच्या वैयक्तिक नंबरवरून कॉल केला. त्याच दिवशी संध्याकाळी ४.१५ वाजता जोडप्याच्या बँक खात्यातून २.२५ लाख रुपये काढले गेले. दुसऱ्या दिवशी ५.९९ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला.

जोडप्याने पोलिसांकडे तक्रार केली, आपले बँक खातेही गोठवले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

ऑनलाइन फ्रॉड ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे गुगलवरच्या नंबर्सवर कॉल केल्यास सावध राहावे. आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये.

ओटीपी, बँक खात्याचा तपशील सार्वजनिक करू नये. कस्टमर सर्विससाठी पैसे आकारले जात नाहीत किंवा सर्विस दिल्यानंतर शुल्क घेतले जाते हे लक्षात ठेवावे.

टॅग्स :online fraud