ChatGPT पेक्षाही भयानक आहे GPT-4, फक्त टेक्स्ट नव्हे तर फोटोजही हँडल करतो..वाचा खासियत l openai announces launched gpt-4 the new version of ai language model know specialty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ChatGPT

ChatGPT पेक्षाही भयानक आहे GPT-4, फक्त टेक्स्ट नव्हे तर फोटोजही हँडल करतो..वाचा खासियत

OpenAI च्या ChatGPT ने त्याच्या भन्नाट फिचर्सने जगभरात खळबळ उडवून दिली होती त्याचीा चर्चा संपत नाही की आता कंपनीने आणखी एक नवीन चॅटबॉट सादर केला आहे. नव्याने लाँच झालेला चॅटबॉट आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट ChatGPT चं नवीन व्हर्जन आहे.

ओपन एआयचे म्हणणे आहे की यामध्ये यूजर्सना पूर्वीपेक्षा चांगला काँटेंट आणि गुणवत्ता मिळेल. या चॅटबॉटचे नाव ChatGPT - 4 आहे. ChatGPT सर्वांसाठी उपलब्ध आहे, परंतु सध्या निवडक यूजर्ससाठी ChatGPT 4 सादर करण्यात आले आहे. चला ChatGPT- 4 बाबत सविस्तर जाणून घेऊया.

2022 मध्ये लॉन्च झाले ChatGPT

ओपन एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणाऱ्या कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये ChatGPT लाँच केले. लोकांना या चॅटबॉटची माहिती मिळताच त्याचा वेगाने वापर होऊ लागला. ChatGPT आल्यानंतर सर्वत्र AI ची चर्चा सुरू झाली.

ChatGPT चं नवं व्हर्जन

Open AI ने आता ChatGPT चं नवं व्हर्जन लाँच केलं आहे. जे ChatGPT च्या तुलनेत चांगले आणि अधिक अचूक असल्याचे सांगितले जात आहे. ओपन एआय म्हणणे आहे की जीपीटी-4 द्वारे चांगले लँग्वेज मॉड्यूल तयार केले जाऊ शकते. ChatGPT-4 क्रिएटिव्ह आणि टेक्निकल रायटिंग टास्क एडिट करू शकते. या चॅटबॉटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो टेक्स्टसह फोटोजसुद्धा हँडल करू शकतो. (Technology)

GPT-4 ने पास केल्यात या एक्झाम

OpenAI ने GPT-4 उत्तीर्ण झालेल्या परीक्षांची यादी देखील आणली आहे. कंपनीने स्कोअरही शेअर केला आहे. GPT-4 ने LSAT वर 88%, SAT गणितावर 89%, GRE परिमाणात 80%, GRE शाब्दिक वर 99% आणि लेखनावर 54% गुण मिळवले.

GPT-4 मोफत आहे का?

ChatGPT 4 मध्ये देखील ChatGPT प्रमाणेच प्रवेश केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला फक्त ओपन एआयच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्यात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे ChatGPT Plus सदस्यत्व असणे आवश्यक आहे. या सदस्यत्वासाठी दरमहा $20 शुल्क आकारले जात आहे.