OPPO K3 च्या लाँचिंगची तारीख ठरली! 19 जुलैला होणार लाँच

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

- OPPO K3 हा स्मार्टफोन OPPO K1 चा अपडेटेड व्हर्जन

नवी दिल्ली : बहुचर्चित OPPO K Series चा OPPO K3 या स्मार्टफोनची लाँचिंगची तारीख आता ठरली आहे. येत्या 19 जुलैला हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या फोनचा टिझर यापूर्वी दाखविण्यात आला होता. त्यानंतर या फोनची चर्चा सगळीकडे सुरु होती. मात्र, आता या फोनची तारीख निश्चित झाली आहे. 

OPPO K3 हा स्मार्टफोन OPPO K1 चा अपडेटेड व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. हा स्मार्टफोन सर्वांत पहिले चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता 19 जुलैला भारतात लाँच केला जाणार आहे. 

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स

- 1080x2340 पिक्सल रेजॉलूशनसह 

- 6.5 इंचचा AMOLED डिस्प्ले. 

- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर.

- गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OPPO K3 will launch in india on 19th july