ऑर्कुटचा सोशल मीडिया नेटवर्कींगला 'हॅलो'

शुक्रवार, 13 एप्रिल 2018

ऑर्कुट कंपनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आपल्या नव्या रुपात परत आली आहे. त्यांनी एक नवीन सोशल मीडिया नेटवर्क 'हॅलो' (Hello) लॉन्च केले आहे.

तुम्हाला ऑर्कुट आठवतंय? पहिले सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ज्याने दुरावलेले मित्र जोडण्याची आणि कनेक्शन वाढविण्याची ताकद लोकांना दिली. एक आभासी जग जेथे आपण जरी आपल्या मित्र-मैत्रीणींना प्रत्यक्षात भेटू शकत नसलो तरी अप्रत्यक्षपणे आपला संवाद आपण कायम ठेऊ शकलो. पण जेव्हा फेसबुक सोशल मिडीयाच्या बाजारात आले आणि फेसबुकने अक्षरशा वेड लावलं. आपल्या इनबॉस्क मधले ऑर्कुट हळुच बाजूला होऊन फेसबुकने आपली पकड मजबुत केली. 30 सप्टेंबर 2014 मध्ये अधिकृतपणे ऑर्कुट बंद पडले. 

Orkut

पण आता पुन्हा ऑर्कुट कंपनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आपल्या नव्या रुपात परत आली आहे. त्यांनी एक नवीन सोशल मीडिया नेटवर्क 'हॅलो' (Hello) लॉन्च केले आहे. फेसबुकवरुन डेटा गैरवापर प्रकरणानंतर करोडो लोकांचा विश्वास उडाला. फेसबुकला सोशल मिडीया मार्केटमध्ये हा विश्वास परत मिळवण्यासाठी धडपड तर करावी लागणार आहेच. पण ऑर्कुटने सोशल मिडीया क्षेत्रात दमदार वापसी करुन फेसबुक समोरील आव्हानांना आणखी वाढविले आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

Orkut

ऑर्कुटचे नवे अॅप 'हॅलो' चे काही महत्वपुर्ण फिचर्स - 
1) 1 हजार पेक्षा अधिक कम्युनिटीज् आणि 100 पेक्षा अधिक तुमच्या स्वारस्यानुसार लोकांचे कनेक्शन.
2) तुमचे स्वारस्य आणि पॅशन यानुसार व्यक्तीमत्त्वे, फ्रेश आणि मिळताजुळता कॉन्टेन्ट.
3) आपल्या निर्मिती, कल्पना आणि अनुभव हे आपली आवड असलेल्या समुदायाशी शेअर करता येईल.
4) खुल्या आणि मैत्रीपूर्ण वातावरणात अर्थपूर्ण संभाषण करता येईल. 
5) तुम्ही करत असलेला एखादा उपक्रम शेअर केलात तर त्या उपक्रमाशी संबंधित आणखी काही लोक शोधता येतील.
6) स्वतःला हवे तसे व्यक्त होता येईल आणि आवडीच्या गोष्टींना शेअर करता येईल.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orkut Is Back With Social Media Network Hello