इंजेक्‍शनच्या वेदनेवर"कम्फर्टेब्ली नम्ब'

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

इंजेक्‍शन म्हटले की भल्या-भल्यांच्या पोटात गोळा येतो. अनेक जण या भीतीपोटी उपचार करून घेण्यासही तयार होत नाहीत. होस्टन येथील राईस युनिव्हर्सिटीतील
संशोधकांनी यावर उपाय शोधला आहे. त्यांनी "कम्फर्टेब्ली नम्ब हे डिव्हाईस विकसित केले आहे. याच्यामुळे इंजेक्‍शन घेताना होणाऱ्या वेदना एका मिनिटात कमी होतात. कॉम्प्युटर
सायंटिस्ट ग्रेग लिसन, बायोइंजिनिअर अँडी झॅंग आणि मेकॅनिकल इंजिनिअर माईक हुआ या तिघांनी मिळून हे छोटे उपकरण बनवले आहे.

याबाबत हुआ म्हणाले,""आम्ही केलेल्या पाहणीत सुमारे वीस टक्के लोकांना डॉक्‍टरकडे जाऊन इंजेक्‍शन घ्यायची भीती वाटते, असे जाणवले. आम्ही बनविलेल्या या थ्रीडी प्रिटेंड"नम्ब'मध्ये दोन वेगवेगळे चेंबर असून, त्यात अमोनिअम नायट्रेट आणि पाणी आहे. थोडेसे हलविल्यास त्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. या डिव्हाइसचा धातूचा पृष्ठभाग त्वचेच्या संपर्कात आल्यानंतर तो भाग काही सेकंदात बधिर होतो. सध्या वापरत असलेल्या पद्धतीत त्वचा बधिर व्हायला बराच काळ लागतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक
तसेच इंजेक्‍शनची भीती वाटणाऱ्यांसाठी हे उपकरण फार उपयुक्त ठरेल.''
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pain on injection of "Comfortably Numb"