कागदाशिवाय चालणारी कंपनी

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

कॉम्प्युटर आल्यापासून अनेक ठिकाणी ऑफिस"पेपरलेस' बनविण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. असाच एक प्रयत्न नेदरलॅंडमधील "डेकॉस' कंपनीने केला आहे. ऑफिस पूर्णपणे "पेपरलेस' बनवून ग्रीन आणि क्‍लीन एनर्जी वापरण्यावर कंपनीचा भर आहे.

पवनऊर्जानिर्मिती केंद्रावरून कंपनीला वीजपुरवठा होतो. कंपनीची इमारत दोन हजार पाचशे चौरस मीटर जागेवर उभारण्यात आली असून, त्यासाठी दोन कोटी वीस लाख पौंड खर्च आला. मीटिंगच्या मिनिट्‌ससाठी कंपनीचे स्वतःचे ऍप असून, सर्व करारांवर ई-सिग्नेचरद्वारे सही केली जाते. येथे कोणत्या ही प्रकारच्या डॉक्‍युमेंटची प्रिंट व बिझनेस कार्ड ही वापरले जात नाही. या ऑफिसमध्ये टिश्‍यू पेपर आणि टॉयलेट पेपर वापरण्यावरही बंदी असून, त्या ऐवजी "शॉवर टॉयलेट'चा वापर केला जातो.

कंपनीच्या सगळ्या नव्या गाड्या इलेक्‍ट्रिक किंवा हायब्रीड आहेत. आम्ही खुल्या ऑफिस गार्डनमध्ये काचेचे पार्टिशन असलेल्या ठिकाणी काम करतो. कपाटांची आवश्‍यकता नसल्याने इमारतीच्या भिंती तिरक्‍या आहेत. कागद न वापरण्याच्या निश्‍चयामुळे आम्ही वर्षाला 16 पेक्षा अधिक झाडे, म्हणजेच एक टनाहून अधिक कागद वाचवतो.''असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paperless company

टॅग्स