
Elon Musk Robot Wives : इलॉन मस्ककडे आहेत रोबोट वाईव्हज्? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
टेस्ला, स्पेस एक्स अशा कंपन्यांचे संस्थापक इलॉन मस्क यांचे तंत्रज्ञानाबद्दलचे प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र, इलॉन मस्क यांच्याकडे चक्क रोबोट पत्नी असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यांचे आपल्या या पत्नींसोबतचे फोटोदेखील व्हायरल झाले आहेत.
टेस्लाने आपला पहिला रोबोट 'ऑप्टिमस' जगासमोर सादर केल्यानंतर काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यामध्ये इलॉन मस्क चक्क महिला रोबोटना किस करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चार फोटोंमध्ये ते वेगवेगळ्या रोबोटना किस करत आहेत. त्यामुळे मस्क यांच्याकडे एकाहून अधिक रोबोट वाईव्हज् असल्याचं बोललं जातंय.
खास आहेत रोबोट
डॅनियल मार्व्हेन नावाच्या एका ट्विटर यूझरने हे फोटो शेअर केले आहेत. "इलॉन मस्कने फ्युचर वाईव्हजची घोषणा केली आहे. मस्क यांनी खास आपल्या इमॅजिनेशनने 'कॅटनिला' ही रोबोट बनवली आहे. यामध्ये मानवांप्रमाणेच भावनांचे सेन्सर्स लावण्यात आले आहेत." असं मार्व्हेनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तो पुढे लिहितो, "कॅटनिला ही सोलर एनर्जीवर चालते, त्यामुळे तिला चार्जिंगची गरज नाही. ती आनंदी किंवा दुःखी होऊ शकते, आणि आपल्या भावना व्यक्त करू शकते. जगात सर्वगुणसंपन्न अशी कोणतीच व्यक्ती नसते, त्यामुळे इलॉन मस्कने हे रोबोट (Elon Musk Robot Wives) तयार केले आहेत."
काय आहे सत्य?
खरंतर ही सगळी एआयची कमाल आहे. "टेस्लाने नुकताच आपला पहिला रोबोट ऑप्टिमस लाँच केला आहे. यानंतर एआयचे धोके दाखवण्यासाठी म्हणून केवळ हे फोटो तयार करण्यात आले आहेत. म्हणजेच हे फोटो एआयच्या मदतीने बनवण्यात आले असून, मस्क यांच्याकडे रोबोट वाईव्हज् नाहीयेत." असं स्पष्टीकरण मार्व्हेनने दिलं आहे.
लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया
या फोटोंवर लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. हे खोटे फोटो आहेत हे लक्षात न घेता काही लोक इलॉनचे कौतुक करत आहेत. तर ज्यांना सत्य माहिती आहे ते मार्व्हेनच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक करत आहेत. दुसरीकडे या सगळ्या प्रकाराला काही यूझर्स मूर्खपणा म्हणत आहेत, तर असे रोबोट खरोखरच तयार करण्याची मागणीही मस्ककडे काही ट्विटर यूझर्सनी केली आहे.