Pixel फॅन्सची निराशा! Google Pixel 6, Pixel 6 Pro भारतात येणार नाही

Pixel फॅन्सची निराशा! Google Pixel 6, Pixel 6 Pro भारतात येणार नाही

गुगलने कंपनीच्या इन-हाउस टेन्सर चिपसेटसह बहुप्रतिक्षित Pixel 6 सिरीज काल रात्री लॉन्च केली. Google Pixel 6, Pixel 6 Pro नवीन रोमांचक वैशिष्ट्ये आणि AI क्षमता असून आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅमेरा असलेला स्मार्ट फोनचा दावा गुगलने केला आहे. भारतातील बरेच जण Google च्या नवे फिचर्स असलेल्या Pixel साठी उत्साहित झाले असतील पण तुमच्यासाठी थोडी वाईट बातमी आहे. किमान सुरवातीच्या टप्प्यात Google Pixel 6, Pixel 6 Pro भारतामध्ये उपलब्ध होणार नसल्याची माहिती गुगलेने दिली आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केले होते की, पिक्सेल 6 मालिका सुरुवातीला फक्त आठ ठिकाणीे लॉन्च केली जाईल. ज्या यादीमध्ये भारताचा समावेश केलेला नाही.

गूगलने सुरवातीला ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, तैवान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या आठ ठिकाणी 28 ऑक्टोबर रोजी Pixel 6 सिरीज सुरू केली आहे. हा स्मार्टफोन सुरवातीच्या टप्यामध्ये भारत, चायना, मिडल ईस्ट आणि इतर युरोपीयन शहरांमध्ये लॉन्च होणार नाही.

गेल्यावर्षी गुगलने Pixel 5 सुरवातीच्या टप्यामध्ये 9 ठिकाणी लॉन्च केली होती. त्या वर्षाच्या यादीमधून आर्यलंड हे ठिकाण वगळण्यात आले होते. गुगलने भारतामध्ये Pixel 5 सह शेवटचे तीन पिक्सेल स्मार्टफोन आणले नाहीत.

कंपनीने देशात Pixel 4 आणि Pixel 5 लॉन्च केले नाही. पण गुगले ने टोन-डाउन Pixel 'A' सिरिजचे स्मार्टफोन भारतात नियमितपणे लॉन्च केले आहेत.अहवाला नुसार, Google Pixel 6, Pixel 6 Pro ची मागणी मोठ्या प्रमाणात असून कंपनी नंतर भारतामध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

गूगलने काल रात्री त्याच्या फॉल लॉन्च इव्हेंटमध्ये Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro प्रो लॉन्च केले. Google चे काम AI सह करण्यासाठी विशेषत: टेन्सर डिझाइन केले गेले आहे.Google Pixel 6अमेरिकेत 599 डॉलर (अंदाजे 45,000 रुपये) किंमतीत लॉन्च झाला आहे, तर Pixel 6 Pro प्रो 899 डॉलर (अंदाजे 67,500 रुपये) किंमत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com