Poco M4 Pro : 64MP कॅमेरासह भारतात लॉन्च, किंमत 14,999 रुपयांपासून सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

poco m4 pro launch with 64mp camera price under 15000 check all details

Poco M4 Pro भारतात लॉन्च, किंमत 14,999 रुपयांपासून सुरू

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कमी किंमतीत स्मार्टफोन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण चीनी फोन निर्माता कंपनी Poco ने आपला नवीन स्मार्टफोन Poco M4 Pro भारतात लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या Poco M4 Pro 5G चा हे 4G व्हेरिएंट आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत तसेच मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2022 इव्हेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 90Hz AMOLED डिस्प्ले, MediaTek Helio G96 चिप, 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी यांसारखे फीचर्स देण्यात आली आहेत.

Poco M4 Pro 4G ची किंमत आणि ऑफर

6GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह Poco M4 Pro 4G व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. हे 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजमध्ये देखील येतो. ज्याची किंमत अनुक्रमे 16,499 आणि 17,999 रुपये आहे. फोनची विक्री 7 मार्चपासून (दुपारी 12) फ्लिपकार्टवर होईल. यादरम्यान, HDFC बँकेच्या कार्डधारकांना 1,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट दिला जाईल. हा स्मार्टफोन कूल ब्लू, पोको यलो आणि पॉवर ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

Poco M4 Pro 4G फीचर्स

Poco M4 Pro 4G स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 90Hz रिफ्रेश रेट (180Hz टच सॅम्पलिंग) आणि होल पंच कट-आउटसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 स्क्रीन संरक्षणासह सर्व-प्लास्टिक बॉडी आहे. यामध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसरसह 128 GB पर्यंत स्टोरेज आणि 8 GB पर्यंत रॅम उपलब्ध आहे. फोन धूळ आणि स्प्लॅश रेजिस्टंटसाठी IP53 प्रमाणित आहे.

विशेष बाब म्हणजे यात व्हर्च्युअल मेमरी एक्सपेन्शन फीचर आणि स्टोरेज एक्सपान्शनचीही सुविधा दिली आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64-मेगापिक्सेल प्राइमरी, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आहे. समोर, यात 16MP सेल्फी कॅमेरा असून यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये ड्युअल स्पीकर आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट रीडर देखील दिले आहे.

टॅग्स :Technology