प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत दुसरा

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: भारतात प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, दिवाळीनंतर दिल्लीमध्ये आलेल्या धुक्‍याने अनेकांचा बळी घेतला. दिल्लीतील मृतांच्या संख्येचा विचार करता प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागत आहे. चीन यामध्ये आघाडीवर असून, चीन आणि भारत या दोन देशांनीच जगातील निम्म्या मृत्यूंची संख्या गाठली आहे.

स्टेब ऑफ ग्लोबरल एअर 2017 यांनी दिलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली असून, हा अहवाल नुकताच बोस्टन येथे जाहीर करण्यात आला. यानुसार 2015 मध्ये 2.54 लाख लोकांचा मृत्यू हा प्रदूषणामुळे ओझोनला झालेली हानी आणि फुफ्फुसांचे आजार यामुळे झाला आहे. ओझोन प्रदूषणामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. बांगलादेशहून 13 पट, तर पाकिस्तानपेक्षा 21 पट मृत्यू भारतात होत आहेत.

अहवालाची व्याप्ती
195
देशांचा समावेश
300
रोगांचा विचार
2000
संशोधकांचा समावेश
92 टक्के
लोक प्रदूषित हवेत राहतात

Web Title: The pollution of other deaths in India