UPI Payment मध्येही फसवणुकीची शक्यता; असं करा व्यवहार सुरक्षित

पैशांच्या व्यवहारांसाठी फक्त यूपीआय पत्ता किंवा मोबाईल नंबर शेअर करा
UPI Payment
UPI PaymentUPI Payment

नवी दिल्ली : मागील काही वर्षांत डिजिटल व्यवहारांमध्ये (Digital transactions) चांगलीच वाढ झाली आहे. मोदी सरकारने डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. यामुळे कॅश व्हवहाराचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्मार्टफोनद्वारे युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरणे खूप सोपे झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे (RBI) पूर्णपणे नियमन केले जात असल्यामुळे मनी ट्रान्सफर खूप विश्वासार्ह आहे. तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण, इंटरनेटवर अवलंबून असताना फसवणूक होण्याची शक्यता (Possibility of fraud in UPI Payment also) नाकारता येत नाही.

यूपीआयमुळे व्यवहार करणे खूप सोपे झाले आहे. असे असताना एकीकडे डिजिटल पेमेंटबाबत (Digital transactions) भीती आणि दुसरीकडे फसवणूक करणारे फसवणुकीचे नवनवे मार्ग शोधत असतात, अशा परिस्थितीत आपल्या बाजूने काळजी घेणे फार गरजेचे आहे. यूपीआय पेमेंटमध्ये (United Payments interface) मोबाईल स्वतःच व्हर्च्युअल मनी वॉलेट म्हणून काम करतो. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. आर्थिक व्यवहारांसाठी मोबाइल ॲपचा वापर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. यातून फसवणूक कशी टाळता येईल हे आपण जाणून घेऊ या...

UPI Payment
आजीचे अवैध संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

यूपीआय संरक्षित करा

पैशांच्या व्यवहारांसाठी फक्त यूपीआय पत्ता किंवा मोबाईल नंबर शेअर करावा. तुम्ही क्यूआर कोड किंवा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस देखील शेअर करू शकता. यापेक्षा जास्त काही शेअर करू नका. पेमेंट ॲप किंवा बँक अप्लिकेशनद्वारे कधीही कोणालाही यूपीआय खात्यात प्रवेश करू देऊ नका. फोन स्क्रीन लॉक पासवर्ड किंवा पीनसह पेमेंट पीन सेट करा. ते कोणाशीही शेअर करू नका.

स्क्रीन शेअरिंग ॲप्सची काळजी घ्या

स्क्रीन शेअरिंग ॲप्सला यूपीआय ॲप्सचा (Screen Sharing Apps) प्रवेश (एक्सेस) देऊ नका. अशा ॲप्समध्ये डेटा लीक होण्याची शक्यता असते. हे पासवर्ड आणि ओटीपीसाठी मोठा धोका होऊ शकतो. सेटिंग्जमध्ये जाऊन स्क्रीन शेअरिंग ॲप्सचा प्रवेश तपासा आणि प्रवेश सुरू असल्यास बंद करा.

UPI Payment
कोरोना वाढतोय, शाळांबाबत निर्णय नाहीच; सीबीएसई शाळा उद्यापासून

लिंक्स, फेक कॉलपासून राहा सावध

हॅकर्स लिंक पाठवून किंवा कॉल करून पडताळणीसाठी दुसरे अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगू शकतात. अशा लिंकवर कधीही क्लिक करू नका आणि अशा कॉलला वेळ देऊ नका.

हे काम नक्की करा

दूर कुठेतरी पैसे पाठवत असाल तर समोरच्या व्यक्तीचा यूपीआय आयडी विचारा. मोबाईल नंबर वापरून पैसे पाठवताना चुकीचा नंबर टाइप केला जाण्याची शक्यता असते सावधगिरी म्हणून तुम्ही मोठी रक्कम पाठवण्यापूर्वी तपासून पाहा.

यूपीआय आयडीवर नोंदणीकृत नाव तपासा

कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी तपशील तपासून घेतला पाहिजे. यूपीआय ॲप क्यूआर कोड स्कॅन करतो किंवा पेमेंटसाठी मॅन्युअली नंबर किंवा वीपीए जोडता. तेव्हा प्राप्तकर्त्याचे नोंदणीकृत नाव स्क्रीनवर दिसते. व्यवहार करण्यापूर्वी नाव तपासावे. पैसे चुकीच्या व्यक्तीकडे गेले तर ते परत येत नाही.

यूपीआय ॲप अपडेट करत रहा

नेहमी यूपीआय ॲपवर अपडेट्स इन्स्टॉल करा. अपडेट केल्याने फोनवर नवीनतम सुरक्षा अपडेट्स येत राहतात. ज्यामुळे ॲप वापरण्यास सुरक्षित होते.

त्वरित तक्रार करा

पेमेंट किंवा व्यवहारात कोणतीही अडचण आल्यास मदत केंद्राद्वारे यूपीआय ॲपवर त्वरित तक्रार करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com