झूम : सेल्टॉसवर ‘एक्स-लाइन’चा ‘तडका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

seltos car

दक्षिण कोरिया देशातील कार उत्पादक कंपनी असलेल्या किआ मोटर्सने ऑगस्ट २०१९ मध्ये ‘सेल्टॉस’ ही सबकॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्ही श्रेणीतील कार भारतात दाखल करून यशस्वी पदार्पण केले.

झूम : सेल्टॉसवर ‘एक्स-लाइन’चा ‘तडका’

दक्षिण कोरिया देशातील कार उत्पादक कंपनी असलेल्या किआ मोटर्सने ऑगस्ट २०१९ मध्ये ‘सेल्टॉस’ ही सबकॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्ही श्रेणीतील कार भारतात दाखल करून यशस्वी पदार्पण केले. अल्पावधीतच ही कार भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘जीटी लाइन’ ही सेल्टॉसची टॉप एडिशन होती. परंतु किआने त्याही पुढे जात वाढत्या स्पर्धेच्या अनुषंगाने सेल्टॉसचे ‘एक्स-लाइन’ हे टॉप व्हेरिएंट भारतीय बाजारात आणले. ही कार दिसायला तशी हटकेच आहे, शिवाय वाढीव फीचर्समुळे आताच्या तरुणाईवर छाप पाडण्याची नक्कीच खात्री देते.

सेल्टॉस आणि सेल्टॉस एक्स-लाइनमध्ये महत्त्वाचे फरक बघायचे झाल्यास तिचा रंग आणि आत-बाहेर बरेच छोटे-मोठे बदल केले आहेत. केवळ मॅट ग्राफाईट या एकाच रंगात आणि ऑटोमेटिक गिअर बॉक्समध्येच ही कार उपलब्ध असणार आहे. सेल्टॉसच्या जीटी लाइन व्हेरिएंटमध्ये पुढे बंपरखाली, बाजूने दरवाजांवर आणि पाठीमागे लाल रंगाची रेषा येते, एक्स-लाइनमध्ये हीच रेषा नारंगी रंगात येते. एखाद्या कारच्या टायरचा आकार तिला भरदास्त बनवतात. ‘सेल्टॉस एक्स-लाइन’च्या बाबतीत नेमकी हीच बाब ध्यानात ठेवलेली दिसते. ‘सेल्टॉस एक्स-लाइन’ला दिलेले १८ इंची टायर तिला अधिक दमदार बनवतात. या आधीच्या सेल्टॉसमध्ये १७ इंची टायर देण्यात आले आहेत.

एटी. डी. (डिझेल) आणि एक्स डी.सी.टी. (पेट्रोल) या दोन प्रकारात असलेल्या ‘सेल्टॉस एक्स-लाइन’ची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे १८.४५ आणि १८.१५ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यातील एक्स-लाइन ‘एटी डी’ या व्हेरिएंटची नुकताच राईड केली. एक्स-लाइनच्या राईडचा अधिक आनंद घेण्यासाठी नॉर्मल, ईको आणि स्पोर्ट्स हे ड्रायव्हिंग मोडही देण्यात आले आहेत. नॉर्मल मोडवर असतानाच तात्काळ पिकअप घेणारी ही कार स्पोर्ट्स मोडवर तर वाऱ्याचा वेग पकडते. शिवाय चारही चाकांना डिस्क ब्रेक दिल्यानं नियंत्रण करण्यात अडचण येत नाही.

कार चालवताना आपल्याला रस्त्यानुरूप हवी तशी ताकद मिळत असल्याने ही कार कामगिरीच्या बाबतीत नाराज करत नाही. एक्स-लाइनची रस्त्यावरील पकड, दृश्यमानता, स्टेअरिंगची हाताळणी आदींच्या बाबतीत तक्रार करण्यासारखे काही नाही. सस्पेन्शन मात्र ठीक आहेत. एक्स-लाइनमध्ये चालकासह पुढील सहप्रवाशासाठी दिलेले व्हेंटिलेटेड सीट, पाठीमागील आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक वातानुकूलन यंत्रणा, त्याबरोबरीने ‘बोस’चे ८ स्पीकरसह असलेली साऊंड सिस्टिम लांबचा प्रवास नक्कीच सुखद बनवते.

इंजिन आणि मायलेज

एक्स-लाइन ‘एटी डी’ या व्हेरिएंटमध्ये ६ स्पीड ऑटोमेटिक गिअर बॉक्स, १४९३ सीसी क्षमतेचे १.५ लिटर सीआरडी-आय व्हीजीटी-४ सिलिंडर इंजिन दिले असून जे ११३.४३ बीएच पॉवर, २५० एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार प्रतिलिटर १८ किलोमीटरचा मायलेज (एआरएआय) देण्याचा दावा केला असला तरी सरासरी १४ ते १६ इतका दमदार मायलेज देऊ शकते.

मुख्य वैशिष्ट्ये

१०.५ इंची इन्फोटन्मेंट सिस्टिम, सनरूफ, किलेस एन्ट्री, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, एअर क्वालिटी कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर, फॉलो मी होम हेडलँप, ३६०°चा दर्जेदार कॅमेरा, ६ एअर बॅग, पार्किंग सेन्सर, क्रँश सेन्सर, चारही चाकांना डिस्क ब्रेक, एबीएस+ईबीडी, ब्रेक आसिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल.

Web Title: Pranit Pawar Writes Seltos Car

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestylecarPranit Pawar