Realme 5G Mobile Price : अबब! फक्त 649 रुपयांमध्ये Realme चा 5G स्मार्टफोन |Flipkart Big Bachat Dhamaal Sale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Realme 5G Mobile Price

Realme 5G Mobile Price : अबब! फक्त 649 रुपयांमध्ये Realme चा 5G स्मार्टफोन

Flipkart Big Bachat Dhamaal Sale: फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. हा सेल 3 मार्चपासून सुरू झाला असून 5 मार्चपर्यंत असणार. या सेलमध्ये लेटेस्ट स्मार्टफोनवर भारी डिस्काउंट दिले जात आहे. जर तुम्ही नवीन 5जी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्या उपयोगी पडू शकतो.

नुकतीच Realme 10 Series चा realme 10 Pro 5G लॉन्च झालाय ज्याला तुम्ही खूप स्वस्त किंमतीत विकत घेऊ शकता. 20 हजार रुपयांचा हा फोन फक्त 649 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. (Realme 5G Mobile Price only 649 rupees read about Flipkart Big Bachat Dhamaal Sale)

Realme 10 Pro 5G (128 GB) ची लॉन्चिंग प्राइज ही 20,999 रुपये आहे मात्र फ्लिपकार्टवर या फोनवर 9 परसेंटचं डिस्काउंट दिले जात आहे म्हणजेच 18,999 रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. सोबतच या फोनवर एक्सचेंज ऑफर सुद्धा आहे ज्यामुळे या फोनची किंमत खूप कमी होणार. अगदी 649 रुपयेसुद्धा होऊ शकते.

Realme 10 Pro 5G वर 18,350 रुपयांचा एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करता तर तुम्हाला 649 रुपये ऑफ मिळू शकतो. मात्र 18,350 रुपयांचा एक्सचेंज ऑफ तेव्हाच मिळणार जेव्हा तुमचा जुना फोन चांगल्या कंडीशनमध्ये असणार आणि मॉडलही लेटेस्ट असेल.