Realme X : रिअलमी घेऊन येत आहे 'स्पायडरमॅन एडिशन'

realme
realme

स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्यात भारतात काही महत्त्वाचे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. विवो, सॅमसंग, शाओमी, ओप्पो आणि रिअलमी या कंपन्यांचे स्मार्टफोन या जुलै महिन्यात भारतात लॉन्च होतील. यातील रिअलमीच्या स्मार्टफोन लॉन्चिंगची सर्वांना उत्सुकता आहे. 

रिअलमी ही कंपनी भारतातील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी आहे. या महिन्यात ही कंपनी Realme X हा फोन भारतात लॉन्च करत आहे. 'स्पायडरमॅन एडिशन'चा हा फोन असून यामुळे मोबाईलप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. 

या पूर्वी हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर तो भारतात लॉन्च होणार असल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. रिअलमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी हा फोन जुलै महिन्यात भारतात लॉन्च होणार असल्याचे सांगितले. 
   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com