अवघ्या 35 मिनिटांत फुल चार्ज होणार 'रिअलमीचा एक्स 2 प्रो'

टीम ई-सकाळ
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

- अवघ्या 15 मिनिटांत 60 तर 35 मिनिटांत 100 टक्के होतोय चार्ज.

- 64 एमपीचा देण्यात आला आहे कॅमेरा.

नवी दिल्ली : रिअलमी या मोबाईल कंपनीने आपले दोन नवे स्मार्टफोन भारतात लाँच केले. 'रिअलमी एक्स2 प्रो' आणि 'रिअलमी 5 एस' हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. 'रिअलमी एक्स2 प्रो' या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज देण्यात आली असून, या फोनमध्ये 50 डब्ल्यू सुपर व्हिओओसी (वूक) फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 33,999 आहे.

रिअलमी एक्स 2 प्रो या स्मार्टफोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी देण्यात आली असून, 50 डब्ल्यू सुपर व्हीओओसी फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजी दिली आहे. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अवघ्या अर्ध्या तासात हा स्मार्टफोन फुल चार्ज होईल, असा दावा कंपनीने केला आहे. 

Realme X2 Pro या स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. कंपनीने आपल्या ग्राहकांच्या गरजा जाणून हा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यामुळे पहिल्या 10 हजार ग्राहकांना हा स्मार्टफोन न आवडल्यास 7 दिवसांत कंपनीच्या सर्व्हिस सेंटरवर परत करता येऊ शकेल. त्यासाठी कोणतेही प्रश्नोत्तरांची विचारणा केली जाणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

कंपनीने Realme X2 Pro शिवाय रेड, पर्पल आणि क्रिस्टल रेड कलरचा Realme 5S, Realme X2 Pro Master 
Edition हे स्मार्टफोन्सही लाँच केले आहेत. 

असे आहेत Realme X2 Pro चे फिचर्स :

- डिस्प्ले : 6.5 सुपर अॅमोलेड.

- बॅटरी : 4000 mAh (Ultra Large Capacity) (4x फास्टर चार्जिंग)

- कॅमेरा : 64 MP Quadcam/20X Zoom, 13 MP, 8MP, 2MP. 

- फ्रंट कॅमेरा : 16 MP (Video/Photo Shoot)

- स्पीकर्स : Dual Super Linear Speakers 

- रॅम : 8GB/128GB, 12GB/256GB

- किंमत : 29,999 रुपये आणि 33,999 रुपये.

=================

असे आहेत Realme X2 Pro Master Edition चे फिचर्स :

- डिस्प्ले : 6.5 सुपर अॅमोलेड.

- कॅमेरा : 64MP Quad Cam

- रॅम : 12GB

- स्टोरेज : 256GB

- किंमत : 34,999 रुपये.

=================

- Realme 5 S : 

- डिस्प्ले : 6.5 इंच

- कॅमेरा : 48 MP Quad 6P High Performance Lense

- कलर : ब्लू, पर्पल, क्रिस्टल रेड

- 665 AIE Snapdragon Qualcom

- बॅटरी : 5000 mAh

- रॅम : 4GB/64GB, 4GB/128GB

किंमत : 9,999 रूपये आणि 10,999 रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Realme X2 pro launched in India High battery charging experience