लॉन्चपूर्वीच लीक झाली Redmi 10A, Redmi 10C ची किंमत! जाणून घ्या

Redmi आपले दोन नवीन स्मार्टफोन Redmi Note 10A आणि Redmi Note 10C भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.
Redmi Note 10A and Redmi Note 10C
Redmi Note 10A and Redmi Note 10C Esakal

Redmi आपले दोन नवीन स्मार्टफोन Redmi Note 10A आणि Redmi Note 10C भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने नुकताच Redmi Note 11T 5G सादर केला आहे आणि लवकरच कंपनी Redmi Note 11S आणणार आहे. Redmi Note 10A आणि Redmi Note 10C या मोबाईलबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असतानाच या मोबाईल्सची किंमत उघड झाली आहे. रेडमीचा हा नवा स्मार्टफोन 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतो, असं बोललं जात आहे. (Redmi 10A and Redmi 10C Price Leaked Ahead of Launch!)

Redmi Note 10A and Redmi Note 10C
Mobile Number: आपला मोबाईल नंबर १० अंकीच का असतो? जाणून घ्या

हे दोन्ही स्मार्टफोन चीन आणि इतर बाजारपेठेत सादर केले जातील अशी माहिती मिळाली आहे. हे दोन्ही फोन 2020 मध्ये लॉन्च झालेल्या Redmi 9A आणि Redmi 9C चे पुढच्या आवृत्या आहेत. जे बजेट फोन शोधत आहेत त्यांच्यासाठी हे आगामी नवीन फोन खूप उपयोगी ठरतील. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Redmi 10A आणि Redmi 10C मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा युनिट असेल. यात 50-मेगापिक्सेल Samsung ISOCELL S5KJN1 सेन्सर किंवा OmniVision OV50C सेन्सर असेल. Redmi 10A आणि Redmi 10C मध्ये कॅमेरा युनिट म्हणून 8-मेगापिक्सेल दुय्यम अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल OVO2B1B किंवा SC201CS मॅक्रो कॅमेरा असेल. परंतु Xiaomi ने अद्याप Redmi 10A आणि Redmi 10C बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Redmi Note 10A and Redmi Note 10C
लवकरच येतायत रेडमीचे दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन; येथे पाहा डिटेल्स

Redmi 9A आणि Redmi 9C ची किंमत-

Redmi 9A ची सध्याची किंमत 7,499 रुपये आहे, जी त्याच्या मूळ मॉडेल 2GB + 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. त्याच वेळी, त्याच्या दुसऱ्या मॉडेलची किंमत 8,299 रुपये आहे, जी त्याच्या 3GB + 32GB स्टोरेजसाठी आहे. Redmi 9C मलेशियामध्ये MYR 429 (अंदाजे रु 7,500) मध्ये लॉन्च करण्यात आला होता, जो 2GB + 32GB स्टोरेज मॉडेलचा आहे. असे म्हटले जात आहे की Redmi 10A 'थंडर आणि लाईट' या तीन सांकेतिक नावांसह येईल. त्याच वेळी, Redmi 10C ची सांकेतिक नावे 'फॉग, रेन' आणि विन्ड अशी येतील. असे बोलले जात आहे की, हे दोन्ही फोन MediaTek चिपसेट सह येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com