Redmi K20 आणि K20 Pro भारतात लाँच

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

शाओमी या मोबाईल कंपनीने भारतात Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन आज (बुधवार) लाँच केले आहेत.

नवी दिल्ली : शाओमी या मोबाईल कंपनीने भारतात Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन आज (बुधवार) लाँच केले आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या अशा किमतीत हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. 

Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन कधी लाँच केले जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु होत्या. 17 जुलैला हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच होतील, अशी माहिती शाओमी इंडियाचे हेड मनु जैन यांनी ट्विटरवरून दिली होती. त्यानंतर आता हे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. 

Redmi K20 या स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये तर Redmi K20 Pro या स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये असणार आहे. 

Xiaomi Redmi K20 चे फिचर्स

स्क्रीन : 6.39-inch full-HD+ AMOLED डिस्प्ले, Corning Gorilla Glass  

प्रोसेसर : Snapdragon 730 SoC 

मेमरी : 8GB of RAM along with up to 256GB storage. 

सेन्सर : pop-up selfie camera and an in-display fingerprint sensor

बॅटरी :  4000mAh battery and an 18W charge in the box. 

कॅमेरा : Triple Rear Camera setup, 48-megapixel primary camera, a 13-megapixel ultra-wide sensor, and an 8-megapixel telephoto lens.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Redmi K20 and Redmi K20 Pro Launched in India