50 MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 11 4G स्मार्टफोन लॉन्च; पाहा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Redmi Note 11 4G

50 MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 11 4G स्मार्टफोन लॉन्च

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने Redmi Note 11 सीरीजचा नवीन स्मार्टफोन Redmi Note 11 4G चीनमध्ये लॉन्च केला आहे. तुम्हाला या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात येत असून यात ऑक्टा-कोर MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि 6GB RAM दिली आहे. यासोबतच 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल.

Redmi Note 11 4G किंमत

Redmi Note 11 4G स्मार्टफोन 4GB RAM + 128GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत अनुक्रमे 999 चीनी युआन (सुमारे 11,700 रुपये) आणि 1,099 चीनी युआन (सुमारे 12,800 रुपये) अशा आहेत. हा स्मार्टफोन Dreamy Clear Sky, Mysterious Blackland आणि Time Monologue कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. चीनमध्ये 1 डिसेंबरपासून त्याची विक्री सुरू होणार आहे. भारतासह इतर देशांमध्ये हा फोन किती दिवसात लॉन्च होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

हेही वाचा: तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; जाणून घ्या पध्दत

Redmi Note 11 4G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11 4G स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट दिला असून हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर काम करतो. यात 6.5-इंच फुल एचडी स्क्रीन, ज्याचे रिझोल्यूशन 1,080x2,400 पिक्सेलसह दिली आहे. त्याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. या डिवाइस मध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि 6GB रॅम देण्यात आली आहे. याशिवाय, फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये पहिला कॅमेरा हा 50MP मुख्य लेन्स, दुसरा 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे आणि तिसरा 2MP डेप्थ सेन्सर आहे. तर स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 8MP कॅमेरा मिळेल.

हेही वाचा: एकाच वेळी लॉन्च झाले 4 नवे इलेक्ट्रिक स्कूटर; किंमतही बजेटमध्ये

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

कंपनीने Redmi Note 11 4G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या हँडसेटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

loading image
go to top