Redmi Note 12 Pro plus: येतोय रेडमीचा 10 मिनिटांत फुल चार्ज होणारा फोन, वाचा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

redmi note 12 pro plus with 210w fast charging gets 3c certification report check specifications

Redmi Note 12 Pro plus: येतोय रेडमीचा 10 मिनिटांत फुल चार्ज होणारा फोन, वाचा डिटेल्स

Redmi ने जगातील पहिला 210W सर्वात फास्ट चार्जिंग फोन Redmi Note 12 Pro+ लॉन्च करण्याची तयारीत आहे. कंपनी हा फोन आपल्या नवीन Redmi Note 12 सीरीजमध्ये लॉन्च करेल. या सीरीज अंतर्गत Redmi Note 12 आणि Redmi Note 12 Pro देखील लॉन्च केले जातील.

Redmi Note 12 सिरीज ही वर्षाच्या अखेरीस देशांतर्गत बाजारात प्रथम सादर केली जाईल. त्यानंतर 2023 च्या सुरुवातीस ते जागतिक स्तरावर सादर केले जाईल. ही सीरीज चायना कंपल्सरी सर्टिफिकेशन (3C) डेटाबेसमध्ये सतत दिसून येत आहे.

MySmartPrice च्या रिपोर्टनुसार, Redmi Note 12 सीरीज प्रो प्लस फोन 210W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ऑफर केला जाईल. तसे झाल्यास हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चार्जिंग फोन असेल. सध्या बाजारात 150W फास्ट चार्जिंगचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro Plus फोन 3C डेटाबेसमध्ये मॉडेल क्रमांक 22101316UCP आणि 22101316UC सह आढळले आहेत.

हेही वाचा: India 5G Launch: देशात उद्यापासून मिळणार 5Gसेवा; PM मोदी करणार सुरूवात

रिपोर्टनुसार, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 अनुक्रमे 120W आणि 67W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज असतील. Redmi Note 12 Pro + च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 6.6-इंचाच्या फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाईल, ज्याला 120 Hz रिफ्रेश रेट मिळेल. प्रो प्लस मॉडेलसह 4,300mAh बॅटरी सपोर्ट असेल आणि प्रो 4,980mAh बॅटरी सपोर्टसह येईल

प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास Redmi Note 12 Pro Plus ला MediaTek Dimensity 8000 प्रोसेसर तसेच, Redmi Note 12 Pro MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर मिळू शकतो. Redmi Note 12 सीरीजच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोनसोबत 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर मिळू शकतो.

हेही वाचा: पुण्यात लॉंच झाली मर्सिडीझची पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रीक कार; देते 857 KM रेंज

टॅग्स :Technology