आता घरात बसून कमवा हजारो रुपये; Jio देतंय अनोखी संधी

Jio POS Lite
Jio POS LiteGoogle

कोरोनामुळे सध्या बरेच जण आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत , या संकटाच्या काळात रिलायन्स जिओने घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. रिलायन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन सेवा देत राहते. खूप कमी लोकांना माहित आहे की रिलायन्स जिओचे Jio POS Lite नावाचे अ‍ॅप आहे, ज्याद्वारे लोक घरी बसून हजारो रुपये सहज कमवू शकतात. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने 2020 मध्ये एक सेवा सुरू केली होती. नेमकं काय आहे Jio POS Lite हे आज आपण जाणून घेणार आहोत.

हे App फक्त अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आहे आणि हे एकदम फ्री असून हे इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाहीत. तसेच हे Jio POS Lite नावाचे अँड्रॉइड अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप एक कम्युनिटी रिचार्ज अ‍ॅप आहे, ज्यामध्ये तुम्हाला या अ‍ॅपद्वारे केलेल्या तुमच्या आणि इतरांच्या फोनमध्ये केलेल्या रिचार्जवर 4.16% कमिशन मिळते. आता नेमकं हे अ‍ॅप कसे काम करते ते जाणून घेऊयात.

Jio POS Lite
Aadhaar, Pan, Voter id, Driving License हरवलंय? असे करा डाऊनलोड

POS Lite अ‍ॅप वरून पैसे कसे कमवायचे?

  • सर्वप्रथम Play Store वरून Jio POS Lite अ‍ॅप इंस्टॉल करा आणि नंतर ते उघडा.

  • मग हे अ‍ॅप काही गोष्टींसाठी तुमची परवानगी मागेल, त्या परवानग्या द्या

  • त्यानंतर आता रजिस्टर करा वर टॅप करा.

  • येथे तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी आणि जिओ मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही रिचार्ज पार्टनरवर टॅप करा.

  • त्यानंतर तळाशी जनरेट ओटीपी वर टॅप करा. आता तुमच्या Jio क्रमांकावर एक OTP येईल, तो येथे टाका.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि ईमेल आयडी विचारले जाईल.

  • इथे तुम्हाला तुमचे लोकेशन सुद्धा सेट करावे लागेल. नंतर नियम आणि अटी तपासा आणि सुरू ठेवा वर टॅप करा.

  • त्यानंतर लॉगिन वर टॅप करा. जेव्हा तुम्ही तुमचा जिओ नंबर एंटर कराल तेव्हा एक ओटीपी येईल, तो एंटर करा.

  • तुमच्याकडे MPIN तयार करण्याचा पर्याय असेल जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा लॉग इन करावे लागणार नाही.

  • या ठिकाणी तुम्हाला तुमचा आवडीचा पिन सेट करावा लागेल.

  • नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 4 पर्याय दिसतील. यामध्ये रिचार्ज, My Earnings, ऑप्शन लोड आणि पासबुकचा समावेश असेल.

  • पहिल्या पर्यायावर जाऊन तुम्ही कोणताही नंबर रिचार्ज करू शकता. तुम्ही कमावलेली रक्कम My Earnings मध्ये दिसेल.

  • कोणताही नंबर रिचार्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या खात्यात किमान 500 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ऑनलाइन बँकिंग वापरू शकता.

  • या अ‍ॅपद्वारे केलेल्या रिचार्जवर तुम्हाला 4.16% कमिशन मिळेल.

स्मार्ट टीव्हीवर करा व्हिडिओ कॉल

जिओने अलीकडेच जिओ फायबर वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट लॉंच केले आहे. कॅमेरा ऑन मोबाईल नाव असलेले हे फीचर वापरुन युजर्स त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर व्हिडिओ कॉल करू शकतात. त्यांना व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी वेबकॅमची गरज पडणार नाही. JioJoin अ‍ॅपवर मोबाईल फीचर कॅमेरा उपलब्ध आहे. हे फीचर वापरुन वापरकर्ते व्हिडिओ कॉलसाठी इनपुट डिव्हाइस म्हणून फोनचा कॅमेरा वापरु शकतील.

Jio POS Lite
Google चे नवे इन-हाऊस प्रोसेसर; Pixel सिरीजमध्ये होणार वापर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com