esakal | रेनोची 'माय 21' ट्रायबर भारतात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

रेनोची  'माय 21' ट्रायबर भारतात दाखल

रेनोची 'माय 21' ट्रायबर भारतात दाखल

sakal_logo
By
प्रणीत पवार

मुंबई : रेनो इंडियाने नवी ट्रायबर "माय 21" हे मॉडेल नुकताच भारतीय बाजारात दाखल केले. 5.30 ते 7.65 लाख या किमतीमध्ये ही कार उपलब्ध आहे. ऑगस्ट 2019 मध्ये रेनोने ''ट्रायबर'' हे सहा-सात आसन क्षमतेची अल्ट्रा -मॉड्युलर कार बाजारात दाखल केली होती. भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांचा अभ्यास करून सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीमध्ये रेनो ट्रायबरची निर्मिती करण्यात आली आहे. रेनो इंडिया आणि फ्रान्स यांच्या वतीने रेनो ट्रायबरची रचना करण्यात आली. ज्यांना ग्राहकांना चार मीटरपेक्षा लहान आणि 6-7 आसनक्षमतेमध्ये कार हवी असेल, अशा ग्राहकांसाठी ट्रायबर हा चांगला पर्याय ठरणार आहे.

ट्रायबर ड्युअल टोन कलर पर्यायामध्ये उपलब्ध आहे. कारचा नवा सीडर ब्राऊन रंग आणि ओआरव्हीएमवरील एलईडी टर्न इंडिकेटर यामुळे कारच्या आकर्षकतेमध्ये भर पडली आहे. ट्रायबर ही एमपीव्ही विभागातील सर्वात किफायतशीर एएमटी असून तिचा देखभाल खर्च कमी असल्याने ग्राहकांना पैशांचा संपूर्ण मोबदला मिळतो, असा दावा कंपनीने केला आहे. ट्रीबरमध्ये 625 लिटरचा बूट स्पेस दिला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये 4 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: किळसवाणा प्रकार; कमोडमध्ये तयार केलं कोल्ड्रिंक अन् केली पार्टी

वैशिष्ट्ये

स्टिअरिंग व्हिल माऊंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल्स

उंची कमी-जास्त करता येईल अशी ड्रायव्हर सीट

ओआरव्हीएमवरील एलईडी टर्न इंडिकेटर

व्हेरिएंट आणि कलर

नवी रेनो ट्रायबर 'माय-21' ही चार व्हेरिएंटमध्ये (आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सझेड) उपलब्ध असणार आहे. यात एमटी आणि इझी-आर एएमटी असे गिअर ट्रान्समिशनचे दोन्ही पर्याय आहेत. ही कार पाच रंगात उपलब्ध असेल. मेटल मस्टर्ड, इलेक्ट्रिक ब्ल्यू, मूनलाईट सिल्व्हर, आईस कूल व्हाईट आणि सीडर ब्राऊन. तर आरएक्सझेड व्हेरिएंट ड्युअल टोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.

व्हेरिएंटनुसार किंमत

आरएक्सई एमटी 5.30 लाख

आरएक्सएल एमटी 5.99 लाख, इझी-आर एएमटी 6.50 लाख

आरएक्सटी एमटी 6.55 लाख, इझी-आर एएमटी 7.05 लाख

आरएक्सझेड एमटी 7.15 लाख, इझी - आर एएमटी 7.65 लाख

संपादन : शर्वरी जोशी

loading image