
Room Cooler : उन्हाळ्यात घर ठेवा थंड, कमी किंमतीत घेवून जा हे '3' एअर कूलर; पाहा डिटेल्स
Room Cooler : उन्हाळा सुरू झाला की घराघरांत पंखे जोराने फिरू लागतात. आता कडक उष्मा थोडा कमी आहे. पण तो सुरू होण्यापूर्वी तुम्ही कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आम्ही तुम्हाला रुम कूलरचे असे काही पर्याय सांगणार आहोत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे आणि फिचर्सच्या दृष्टीने ते खूप चांगले आहेत. शिवाय फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटवरून हे कुलर खरेदी करून तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. या कूलरवर उपलब्ध असलेल्या अनेक बँक ऑफर आणि सवलतींचा तुम्ही लाभ कसा घ्यायचा हे जाणुन घेऊ.
Hindware 45 L रूम/पर्सनल एअर कूलर
जर तुम्हाला तुमच्या घरासाठी कूलर घ्यायचा असेल, तर Hindware 45L रूम कूलर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या कूलरची मूळ किंमत 9,990 रुपये आहे परंतु तुम्ही हा कूलर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वरून 36 टक्के सवलतीनंतर 6,299 रुपयांना खरेदी करू शकता. या कूलरच्या डीलवर तुम्हाला अनेक डिस्काउंट ऑफर्सचा लाभ मिळत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी या कूलरच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटीही उपलब्ध आहे. या कुलरची टाकी क्षमता 45L आहे.
केनस्टार 40 एल रूम/पर्सनल एअर कूलर
जर तुम्हाला तुमच्या उन्हाळ्यात थंडावा अनुभवायचा असेल तर हा कूलर तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. या कूलरची मूळ किंमत 10,990 रुपये आहे. परंतु तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून 41 टक्के डिस्काउंटनंतर 6,490 रुपयांना सहज खरेदी करू शकता. या कूलरवर तुम्हाला अनेक बँक ऑफर्सचा लाभही मिळत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी यावर EMI चा पर्यायही उपलब्ध आहे.
ओरिएंट इलेक्ट्रिक 50 एल विंडो एअर कूलर
या कूलरची मूळ किंमत 9,890 रुपये आहे परंतु तुम्ही फ्लिपकार्टवरून 36 टक्के सूट देऊन 6,299 रुपयांना खरेदी करू शकता. या कूलरसोबत तुम्हाला एक्सचेंज ऑफरचाही लाभ मिळत आहे. म्हणजेच नवीन कूलर घेताना तुम्ही जुने कूलर बदलले तर तुम्हाला 900 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.