नोटाबंदीनंतर तीन दिवसांत 1 लाख आयफोनची विक्री

मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेल्या बंदीनंतर तीन दिवसांतच तब्बल एक लाख आयफोनची विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेकांनी महगड्या वस्तूंची खरेदी करण्यावर भर दिला. यामध्ये सोने व आयफोनसारख्या वस्तूंचा समावेश होता. नोटाबंदीनंतर पहिल्या तीन दिवसांमध्येच तब्बल 1 लाख आयफोनची विक्री झाली. महिन्याला साधारण हे प्रमाण तीन चतुर्थांश असते.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेल्या बंदीनंतर तीन दिवसांतच तब्बल एक लाख आयफोनची विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेकांनी महगड्या वस्तूंची खरेदी करण्यावर भर दिला. यामध्ये सोने व आयफोनसारख्या वस्तूंचा समावेश होता. नोटाबंदीनंतर पहिल्या तीन दिवसांमध्येच तब्बल 1 लाख आयफोनची विक्री झाली. महिन्याला साधारण हे प्रमाण तीन चतुर्थांश असते.

नोटाबंदीनंतर अनेकांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून महागड्या वस्तूंची खरेदी केली. आयफोन 7 व आयफोन 7 प्लसची किंमत साधारणतः साठ हजार ते 92 हजार रुपये एवढी आहे. यामुळे आयफोनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा व्यापाऱयांकडे जमा झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.