टेक्नोहंट : स्वागत नव्या मोबाईल्सचे

ऋषिराज तायडे
Thursday, 18 February 2021

नोकिया 3.4 व नोकिया 5.4
आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यातील पहिला मोबाईल होता तो ‘नोकिया’चा. विश्वासार्हता आणि बाजारात फारशी स्पर्धा नसल्याने नोकियाचा सर्वत्र दबदबा होता. मात्र, हळूहळू स्पर्धा वाढली आणि काळानुरूप बदलणारे तंत्रज्ञान न स्वीकारल्याने नोकिया कंपनी मागे पडली.

नोकिया 3.4 व नोकिया 5.4
आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यातील पहिला मोबाईल होता तो ‘नोकिया’चा. विश्वासार्हता आणि बाजारात फारशी स्पर्धा नसल्याने नोकियाचा सर्वत्र दबदबा होता. मात्र, हळूहळू स्पर्धा वाढली आणि काळानुरूप बदलणारे तंत्रज्ञान न स्वीकारल्याने नोकिया कंपनी मागे पडली. सात-आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नोकियाने पुनरागमन करत नवे मोबाईल सादर केले आहेत. त्यापैकी नोकिया 3.4 आणि नोकिया 5.4 हे दोन मोबाईल नुकतेच बाजारात दाखल झाले.

May be an image of text that says "नोकिया 5.4 6.39 एचडी+ क्वालकॉम स्नपडरँगन 662 Specifications डिस्प्ले प्रोसेसर रॅम स्टोरेज कॅमेरा फ्रंट कॅमेरा बॅटरी ऑपरेटिंग सिस्टिम किंमत नोकिया 3.4 6.39 एचडी+ क्वालकॉम स्नॅपड्ूॅगन 460 GB 64 GB (512 GBपर्यंत एक्स्पान्डेबल) MP 2MP+ LED Flash 64 GB (512 GBपर्यंत एक्स्पान्डेबल) 48 MP+5 MP+2 MP+2 MP+LED Flash 16MP 13 MP 8MP 4000mAh ॲण्डॉईड 10 (लवकरच ॲण्ड्रॉईड 11 मध्ये) 13,999 आणि 15,499 रुपये 4000mAh ॲण्ड्रॉईड 10 (लवकरच ॲण्डॉईड 11मध्ये) 11,999 रुपये"

रिअलमी एक्स 7 - 5G व रिअलमी एक्स 7 प्रो - 5G
ओप्पोची उपकंपनी असलेल्या रिअलमीने नवनवीन उत्पादने सादर करत ग्राहकांची पसंती मिळवली. मोबाईल, इअरबड्स, स्मार्टवॉच, पॉवरबँक, स्मार्टटीव्हींच्या माध्यमातून रिअलमीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत सादर केलेल्या मोबाईल्सला भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाल्याने रिअलमीने नुकतेच दोन नवे मोबाईल लॉन्च केले आहे, ते म्हणजे रिअलमी एक्स 7 प्रो - 5G आणि  रिअलमी एक्स 7 प्रो - 5G.

May be an image of text that says "रिअलमी एक्स 7-5G रिअलमी एक्स 7 प्रो- 5G 6.4 एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन 6.5 एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन मीडियाटेक डायमेन्सिटी 800 U प्रोसेसर मीडियाटेक डायमेन्सिटी 1000+ 5G 6GB+8GB GB 128 GB Specifications डिस्प्ले प्रोसेसर रॅम स्टोरेज कॅमेरा फ्रंट कॅमेरा बॅटरी ऑपरेटिंग सिस्टिम किंमत 64 MP MP 128 GB MP 64 MP MP 16MP 4310 mAh ॲण्ड्रॉईड 10v (Q) 19,999 आणि 21,999 रुपये 32 MP 4500 mAh ॲण्ड्रॉईड 10v (Q) 29,999 रुपये"

सॅमसंग गॅलेक्सी एफ62
`F` मालिकेतील मोबाईल्सला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सॅमसंगने गॅलेक्सी एफ62 हा नवाकोरा मोबाईल भारतात लॉन्च केला. तब्बल 7000 mAh बॅटरी आणि 64 MP क्वाड कॅमेरा हे या मोबाईलचे खास वैशिष्ट्ये. जाणून घेऊया सॅमसंग गॅलेक्सी एफ62 विषयी

इन्फिनिक्स 'स्मार्ट 5'
या मोबाईल कंपनीने आता ‘स्मार्ट 5’ हा नवा मोबाईल सादर केला आहे. 6000 mAh बॅटरी,  6.82 इंचाचा डिस्प्ले आणि हेलिओ जी25 ऑक्टा कोअर प्रोसेसर ही या मोबाईलची खास वैशिष्ट्ये.

May be an image of text that says "इन्फिनिक्स स्मार्ट 5' 6.82 एचडी+ सिनेमॅटिक डॉप लॉच हेलिओ जी25 ऑक्टा कोअर 2GB सॅमसंग गॅलेक्सी एफ62 6.7 एफएचडी+ एमोल्ड सॅमसंग एक्सिनोस 9 ऑक्टा 9825 6 8GB 128 GB (512 GBएक्स्पान्डेबल) 64 MP + 12 MP MP+ 5 MP Specifications डिस्प्ले प्रोसेसर रॅम स्टोरेज कॅमेरा फ्रंट कॅमेरा बॅटरी ऑपरेटिंग सिस्टिम किंमत 32 MP 32 GB (256 GB एक्स्पान्डेबल) 13 MP एआय ड्युएल कॅमेरा 7000 mAh ॲण्डॉाईड 11 23,999 आणि 25,999 रुपये 8 MP 6000 mAh ॲण्डरॉईड 10 7,199 रुपये"

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rushiraj tayade Writes about New Mobile