टेक्नोहंट : वर्क फ्रॉम होमसाठी पॉवरफुल लॅपटॉप

Laptop
Laptop

1) मायक्रोसॉफ्ट सरफेस गो
मायक्रोसॉफ्टने उत्तम परफॉर्मन्स, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, आकर्षक स्टाइल या सगळ्यांचा मेळ साधणारा सरफेस गो प्रीमियम लॅपटॉप नुकताच भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. हल्ली वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन एज्युकेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या कामांसाठी लॅपटॉपचा वापर पूर्वीपेक्षा वाढला आहे. ग्राहकांची गरज हा लॅपटॉप निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वास मायक्रोसॉफ्टने व्यक्त केला. अवघ्या 1.11 किलोग्रॅम वजनाचा सरफेस लॅपटॉपमध्ये 12.4 इंची पिक्सेलसेन्स टचस्क्रीन डिस्प्ले, टायपिंग करता येण्यासाठी फूल-साईज की-बोर्ड, मोठा प्रीसिजन ट्रॅकपॅड आणि दिवसभर चालणारी बॅटरी, म्युझिक आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी बिल्ट इन स्टुडिओ माईक्स, दमदार स्पीकर्स आणि 720p एचडी कॅमेरा, अॅक्सेसरी सपोर्टसाठी  USB-C आणि USB-A पोर्ट्स, 10th जेनरेशन इंटेल क्वाड-कोअर प्रोसेसर, 16 GB RAM आणि 256GB पर्यंतचे स्टोरेज यामध्ये देण्यात आले आहे. विविध मॉडेल्स 63,000 रुपयांपासून उपलब्ध झाले आहे.

2) एसर क्रोमबुक स्पीन 514
एएमडी रायझन 3000 सी- सीरिज  प्रोसेसर आणि एएमडी रेडिएन ग्राफिक्सने सुसज्ज असलेला एसर क्रोमबुक स्पीन 514 नुकताच सादर करण्यात आला झाला. स्टायलिश डिझाइन, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी हे या लॅपटॉपचे खास वैशिष्ट्य. या लॅपटॉपमध्ये  देण्यात आलेला एएमडी रेडिएन ग्राफीक्स हा कॉन्टेन्ट क्रिएशन, स्ट्रीमिंग तसेच गेमिंगसाठी अधिक उपयोगी ठरेल, असा दावा एसरने व्यक्त केला.

दहा तास टिकणारी बॅटरी, 1.55 किलोग्रॅम वजन, 17.85 मिमी बॉडी, 16 GB RAM  आणि 256GB स्टोरेज, 14 इंची फुल एचडी टचस्क्रीन डिस्प्ले, गोरिला ग्लासद्वारा संरक्षित स्क्रीन, सोबत दिलेल्या बॅकलाईट की-बोर्डमुळे सहजपणे टंकलेखन करता येते. अॅक्सेसरी सपोर्टसाठी दोन USB-C पोर्ट्समुळे फाईल ट्रान्सफर, यूएसबी चार्जिंग तसेच कार्ड रीडरचा वापर करता येईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

3) हॉनर मॅजिकबुक 14
हॉनर कंपनीने नुकताच मॅजिकबुक 14 हा लॅपटॉपची घोषणा केली. 11 व्या जनरेशनसह इंटेल कोअर I-7 प्रोसेसर आणि एनव्हिडिए जीफोर्स  एमएक्स 450 डिस्क्रिट ग्राफिक्सने हा लॅपटॉप सुसज्ज आहे. आतापर्यंत हॉनरने सादर केलेल्या लॅपटॉपच्या तुलनेत या लॅपटॉपचा परफॉर्मन्स 50 टक्क्यांनी अधिक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 14 इंची फुल एचडी आयपीएस डिस्प्ले, 84 टक्के स्क्रीन टु बॉडी रेशो, 1.38 किलोग्रॅम वजन, उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय 6 ड्युअल एन्टेना, ब्ल्युटूथ, 720p एचडी वेबकॅम, फिंगरप्रिंट सेन्सर या लॅपटॉपमध्ये देण्यात आले आहे. तब्बल 56 तास चालणारी बॅटरी आणि 16 GB RAM, 512 GB स्टोरेजमुळे हा लॅपटॉप ग्राहकांचा पसंतीस उतरेल. भारतीय बाजारपेठेत या लॅपटॉपची किंमत साधरणतः 50 हजारांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com