टेक्नोहंट : सावधान... पुढे धोका आहे...!

ऑनलाइन शॉपिंग सध्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. अगदी मोबाईल कव्हरपासून ते एसी, रेफ्रिजरेटरपर्यंत सर्वकाही आपण ऑनलाइन खरेदी करतो.
टेक्नोहंट : सावधान... पुढे धोका आहे...!

ऑनलाइन शॉपिंग सध्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. अगदी मोबाईल कव्हरपासून ते एसी, रेफ्रिजरेटरपर्यंत सर्वकाही आपण ऑनलाइन खरेदी करतो. लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स वेबसाईट्सवरील व्यवहारात तब्बल 210 टक्के वाढ झाल्याचे ‘रेझर-पे’च्या रिपोर्टमधून पुढे आले. ऑनलाइन शॉपिंग करताना काही ई-कॉमर्स वेबसाईट्स कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय देत नसल्याने तुम्हाला ऑनलाइन पेमेंट्स करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यावेळी सायबर हल्ला होऊन डेटा चोरी होण्याबरोबरच तुमचे अकाऊंट रिकामे होण्याची शक्यता असते. ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून....

1) सोशल मीडियावरील जाहिरातींपासून सावध

अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय ऑनलाइन केला आहे. सोशल मीडिया, मार्केटप्लेसेसवर ते जाहिराती करतात. त्या अनेकदा रेकमन्डेशन म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचतातही; मात्र ई-कॉमर्सच्या महासागरात सर्वच व्यावसायिक प्रामाणिक असतातच असे नाही. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित वेबसाईटचे रिव्ह्यूज, ग्राहकांच्या त्यावरील प्रतिक्रिया नक्की वाचा. परंतु तरीही खबरदारी म्हणून नामांकित आणि प्रचलित असलेल्या ई-कॉमर्स वेबसाईट्सचा वापर केलेला चांगले...

2) पॅडलॉकशिवाय व्यवहार नकोच

ऑनलाइन व्यवहार करताना खात्री केल्यास संभाव्य धोका टाळता येतो. त्यासाठी संबंधित वेबसाईट्स सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी टास्कबारच्या डाव्या बाजूला पॅडलॉक असतो. त्याशिवाय वेबसाईट्सच्या यूआरएलची सुरूवात ‘http://’ किंवा ‘https://’ ने होते का तपासा. ‘http://’ च्या तुलनेत ‘https://’ हे अधिक सुरक्षित असते. ‘https://’ मधील ‘s’ म्हणजे secure. तसेच कोणतीही वेबसाईट सुरक्षित अथवा अधिकृत आहे की, नाही हे ssltrust.in. या वेबसाईटच्या मदतीने तपासता येते.

3) सार्वजनिक वाय-फाय टाळा

सध्या अनेक ठिकाणी सार्वजनिक वायफाय सुरू झाले आहे; मात्र ऑनलाइन आर्थिक व्यवहार करायचे असतील, तर सार्वजनिक वायफायचा वापर टाळलेलाच बरा. कारण बहुतांश सार्वजनिक वायफाय हे असुरक्षित असतात आणि त्या माध्यमातून सायबर हल्ला होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक वायफायचा वापर करायचाच झाला, तर सुरक्षिततेसाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर करावा. त्या तुलनेत वैयक्तिक वायफाय किंवा मोबाईल इंटरनेटचा वापर कधीही चांगले.

4) सुरक्षित पेमेंट गेटवेचा वापर

ऑनलाइन व्यवहार करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स प्रविष्ठ करण्यासाठी तुम्हाला पेमेंट गेटवेवर जावे लागते. त्यावेळी पेमेंट गेटवे असणारी वेबसाईट सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करणे गरजे आहे. पेमेंट गेटवेची वेबसाईट सुरक्षिततेचे नियम पाळत असल्याची खात्री देत असेल, तरच पुढील व्यवहार करावा.

5) व्यवहार मोबाईलवरून करा

ऑनलाइन व्यवहार करताना कार्यालयीन डेक्सटॉप किंवा इतरांच्या मोबाईलचा वापर करू नये. त्यासाठी तुमच्या स्वतःच्याच मोबाईलचा करावा. कारण स्वतःच्या मोबाईलवरून व्यवहार करताना ओटीपी हा तुमच्याच मोबाईलवर येतो. त्यामुळे तो चोरीला जाण्याची शक्यता कमी असते, तसेच सुरक्षिततेसाठी पेमेंट गेटवेवरून तयार झालेल्या लिंकवरूनच पेमेंट करा. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवरून किंवा क्यूआर कोडवरून कधीही पेमेंट करू नये.

6) कॅश ऑन डिलिव्हरी इज बेस्ट!

एवढी सर्व खबरदारी घेतल्यानंतरही तुम्हाला ऑनलाइन व्यवहार किंवा पेमेंट करताना सुरक्षिततेची खात्री वाटत नसल्यास सर्वांत सोप्पा उपाय म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. बहुतांश नामांकित कंपन्या कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय देतात. त्यामुळे हा पर्याय कधीही उत्तमच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com