मोबाईलविश्वात दररोज नवनव्या घडामोडी घडत असतात. दर महिन्याला किंबहुना दर आठवड्याला बाजारात नवनवीन मोबाईल बाजारात येतच असतात. नव्या वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक मोबाईल बाजारात आले. त्यापैकी निवडक मोबाईलची थोडक्यात माहिती...

आयटेल व्हिजन 1 प्रो
किफायतशीर दरात उत्तमोत्तम मोबाईल देणाऱ्या आयटेलने आता आणखी एक नवा मोबाईल बाजारात आणला आहे. 4000 एमएएच बॅटरी आणि साडेसहा हजार रुपये किमतीमुळे हा मोबाईल खऱ्या अर्थाने किफायतशीर आहे.
विवो वाय 20 जी
नेहमीच वेगवेगळी वैशिष्ट्यांसह नवनवे मोबाईल सादर करणाऱ्या विवो कंपनीने गेल्या महिन्याभरात मोबाईलची मोठी रेंज बाजारात आणली. त्यापैकी समाज माध्यमांवर चर्चेत असलेला मोबाईल म्हणजे विवो वाय 20 जी होय.या मोबाईलची किंमत 14,990 रुपये आहे.
ओप्पो रेनो 5प्रो 5जी
ओप्पोनेही नव्या वर्षात सादर केलेला हा पहिलाच 5 जी मोबाईल आहे. 2021 साली सर्वत्र 5जी सेवा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता ओप्पोनेही आपला नवाकोरा रेनो 5प्रो 5जी मोबाईल सादर केला. 8 जीबी व 12 जीबी रॅम आणि 256 जीबी मेमरी असलेल्या या मोबाईलची 22 जानेवारीपासून विक्री सुरू होणार आहे.
Edited By - Prashant Patil