Facebook and Instagram
Facebook and InstagramSakal

टेक्नोहंट : कोरोनाबधितांसाठी फेसबुकवरूनही प्रार्थना

भारतात सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया म्हणून फेसबुकची ओळख. यंदाचं वर्ष फेसबुकसाठी खास ठरलं. कल्पनेच्या पलीकडे जाऊन फेसबुकने मेटाव्हर्सची घोषणा केली.
Summary

भारतात सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया म्हणून फेसबुकची ओळख. यंदाचं वर्ष फेसबुकसाठी खास ठरलं. कल्पनेच्या पलीकडे जाऊन फेसबुकने मेटाव्हर्सची घोषणा केली.

भारतात सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया म्हणून फेसबुकची ओळख. यंदाचं वर्ष फेसबुकसाठी खास ठरलं. कल्पनेच्या पलीकडे जाऊन फेसबुकने मेटाव्हर्सची घोषणा केली. त्याच पार्श्वभूमीवर फेसबुकने नुकतेच त्यांच्या कंपनीचे रिब्रॅण्डिंग केलं असून, मेटा या पालक कंपनींच्या अख्यतारित फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअॅप काम करणार आहे. दरम्यान, या घडामोडींसह वर्षभरातील अनेक घटनांमुळे फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर वेगवेगळे ट्रेण्ड्स चर्चेत राहिले. याबाबतचा ‘इअर इन रिव्ह्यू २०२१’ रिपोर्ट फेसबुककडून नुकताच जारी करण्यात आला. त्यातही कोरोनाकाळात आपला रुग्ण लवकर बरा व्हावा, म्हणून सोशल मीडियावरूनही प्रार्थना करण्यात आली. हीच प्रार्थना फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही सर्वाधिक चर्चेत राहिली.

1. आरोग्य

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा २०२१मध्ये भारताला मोठा फटका बसला. लाखो रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आपला रुग्ण कोरोनातून लवकर बरा व्हावा, वाचावा म्हणून अनेकजण देवाकडे प्रार्थना करत होते. यंदा या प्रार्थनेला फेसबुकचीही साथ मिळाली. या अंतर्गत ‘प्रेयर’, ‘ऑक्सिजन’, ‘व्हॅक्सिन’ तसेच ‘हॉस्पिटल’ हे विषय ट्रेण्डिंगमध्ये होते.

  • प्रेयर

  • ऑक्सिजन

  • व्हॅक्सिन

  • हॉस्पिटल

  • फ्लॅक्ससीड (जवस)

2. क्रीडा

क्रीडा क्षेत्रासाठी २०२१ हे वर्ष अनेक घडामोडींनी व्यापलेलं होतं. टोक्यो ऑलिम्पिकच नव्हे, तर पॅरालिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. महिला क्रिकेटपटूंनी विशेषतः मिताली राज, झुलन गोस्वामी आणि स्मृती मानधना यांनी केलेल्या कामगिरीचा नेटकऱ्यांनी गौरव केला.

  • गोल्ड मेडल

  • टोक्यो ऑलिम्पिक

  • आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

  • वुमन्स वनडे इंटरनॅशनल क्रिकेट

  • पॅरालिम्पिक गेम्स

3. सांस्कृतिक

भारताला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे, असे आपण नेहमीच म्हणतो. वर्षभरात होणारे वेगवेगळे कला-संस्कृती, सण, चित्रपट आदींची झलक फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी गेल्या वर्षभरात गरबा हा टॉप ट्रेण्ड ठरला. त्यापाठोपाठ बॉलिवूड चित्रपट ''शेरशाह''च्या निमित्ताने स्वातंत्र्यदिन, हुतात्मा कॅ. विक्रम बात्रा हे विषयही चर्चेत होते.

  • गरबा

  • कॅप्टन विक्रम बात्रा

  • इंडिपेन्डन्स डे

  • ज्वेलरी

  • क्रिप्टोकरन्सी

4. रील्स

सध्याच्या तरुणाईचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील सर्वांत लोकप्रिय फीचर म्हणजे रील्स. अवघ्या काही सेकंदाच्या व्हिडिओच्या रील्यच्या मदतीने अनेकजण सोशल मीडियावर ‘इन्फ्लूएन्सर’ ठरले आहे. रिल्ससोबतच त्यासाठी वापरली जाणारी गाणीही तितकीच लोकप्रिय ठरली.

  • रातां लंबीया

  • आयफोन लॉक

  • बचपन का प्यार

  • बारीश की जाए

  • लूट गए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com