वायरलेस व्हर्च्युअल रिॲलिटीचा अनुभव

बुधवार, 17 जानेवारी 2018

टाइम झोंबीज, बार्किंग आयरन्स, प्लॅंकटोज आणि ड्रोनस्ट्रॉर्म या गेम्सची नावे ऐकली आहेत? कदाचित नसेल कारण हे गेम आभासी विश्‍वातील म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटीमधील आहेत. व्हर्च्युअल रिॲलिटी किंवा व्हीआर म्हणजे संगणकाच्या आधारे तयार केलेले थ्रीडी वातावरण. ही व्हर्च्युअल रिॲलिटी अनुभवण्यासाठी हेडसेट लागतात. हा हेडसेट डोक्‍यावर बसवल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर त्याचा स्क्रीन येतो. वास्तवातील आजूबाजूच्या गोष्टी त्यामुळे दिसत नाहीत आणि स्क्रीनवरील आभासी जगामध्ये आपण प्रवेश करतो. हेडसेटच्या सोबत हेडफोनद्वारे आपल्याला म्युझिक किंवा अन्य आवाज ऐकू येतात.

टाइम झोंबीज, बार्किंग आयरन्स, प्लॅंकटोज आणि ड्रोनस्ट्रॉर्म या गेम्सची नावे ऐकली आहेत? कदाचित नसेल कारण हे गेम आभासी विश्‍वातील म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटीमधील आहेत. व्हर्च्युअल रिॲलिटी किंवा व्हीआर म्हणजे संगणकाच्या आधारे तयार केलेले थ्रीडी वातावरण. ही व्हर्च्युअल रिॲलिटी अनुभवण्यासाठी हेडसेट लागतात. हा हेडसेट डोक्‍यावर बसवल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर त्याचा स्क्रीन येतो. वास्तवातील आजूबाजूच्या गोष्टी त्यामुळे दिसत नाहीत आणि स्क्रीनवरील आभासी जगामध्ये आपण प्रवेश करतो. हेडसेटच्या सोबत हेडफोनद्वारे आपल्याला म्युझिक किंवा अन्य आवाज ऐकू येतात. डोळे, डोक्‍याची हालचाल टिपण्यासाठी सेन्सरचा वापर केला जातो. 

‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ तंत्रज्ञान तसे नवे नाही; पण आता या तंत्रज्ञानामध्ये बरेच बदल होत आहेत. प्रेक्षकांना अधिक थरारक आणि इंटरएक्‍टिव्ह व्हर्च्युअल रिअलिटी (व्हीआर) असलेला कंटेंट देण्यासाठी वायरलेस व्हर्च्युअल रिॲलिटी गेमिंग झोन निर्माण केले जात आहेत. अनेक व्हीआर तंत्रज्ञानामध्ये फक्त सुधारित व्ह्यूअर एक्‍स्पिरिअन्स दिला जातो; पण फूल मोशन इंटरएक्‍टिव्ह अनुभव वायरलेस तंत्रज्ञानामुळे होतो. वायरलेस ‘व्हीआर पॉडस’ घालून गेम खेळणाऱ्या व्यक्तीला फिरताना त्रास म्हणजे ‘मोशन सिकनेस’चा त्रास होत नाही आणि फूल मोशन ट्रॅकिंग होते. संपूर्ण शारीरिक हालचाली (फिजिकल मोशन) आणि अतिशय अचूक अशा पर्सनल ट्रॅकिंगमुळे ‘युजर डिसओरिएंटेशन’ होत नाही. ‘अनटीथर्ड हेडसेट्‌स’मुळे वापरण्यास सहज अशी हालचाल करता येते व एकाच ‘व्हर्च्युअल स्पेस’मध्ये अनेक व्यक्तींना सहभागी होता येते. या व्हर्च्युअल रिॲलिटी झोनमध्ये गेम युजर मुक्तपणे फिरू शकतात व त्यांना ‘अल्ट्रा लो-लॅटन्सी’ असते म्हणजे फिरणाऱ्यांना फिरल्यामुळे अजिबात चक्कर येत नाही. वायरलेस तंत्रज्ञानामुळे ‘मल्टी-प्लेअर’ आणि ‘मल्टी-लोकेशन’ची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आपण दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून गेम खेळू शकतो. म्हणजेच तुम्ही तुमच्या फ्रेंड्‌ससोबत मिळून एक टीम बनवून खेळू शकता. व्हर्च्युअल रिॲलिटी गेमिंगचा कंटेंटही नियमित प्रकारे बदलला जातो. जेणेकरून प्रेक्षकांना प्रत्येकवेळी नवा अनुभव मिळू शकतो. व्हीआर गेम्स खेळण्यासाठी तशी वयाची किंवा अन्य कोणतीही अट नाही; पण सुरक्षेच्या कारणास्तव वय वर्ष तीन किंवा पाचपुढील मुला-मुलींना परवानगी  दिली जाते.