सॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक!

टीम ई-सकाळ
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सॅमसंग गॅलेक्सी ए91चा लूक हा सॅमसंगच्याच नोट 10शी मिळता जुळता आहे.

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी ए91 या बहुचर्चित फोनच्या लाँचिंगला अजूनही सहा महिने बाकी आहेत. पण, या फोनची चर्चा आतापासूनच सुरू झालीय. विशेष म्हणजे, फोनचे फिचर्स आणि त्याचा लूक लिक झाल्याची चर्चा आहे. ऑनलिक या ट्विटर अकाऊंटचा होल्डर स्टिव्ह मॅकफ्लायनं ए91चा लूक लिक केलाय. या फोनचा कॅमेरा सर्वांत भन्नाट फिचर असण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कसा असेल मोबाईल?
मिळालेल्या माहितीनुसार ए91चा लूक हा सॅमसंगच्याच नोट 10शी मिळता जुळता आहे. मोबाईलच्या मागे चौकोनी अकाराचे 'कॅमेरा मॉड्युल' दिसत आहे. त्यात चार वेगवेगळे सेन्सर्स दिसत आहेत. मोबाईलच्या रेंडर फोटोवरून (ग्राफिक्सच्या साह्याने तयार केलेला फोटो) मोबाईलला होल-पंच डिस्प्ले असल्याचं स्पष्ट होतंय. नोट-10 प्रमाणच पंच डिस्प्ले स्क्रिनच्या मधोमध असणार आहे. काही ठिकाणी हा मोबाईल गॅलेक्स एस-10 लाईट नावानं लाँच केला जाईल. भारतात हा मोबाईल ए91 नावानच लाँच होण्याची शक्यता आहे. 

No photo description available.

कॅमेरा फिचर भन्नाट
या मोबाईलचं कॅमेरा फिचर जबरदस्त असण्याची शक्यता आहे. त्यात 48 मेगा पिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर असणार आहे. त्याच्या बरोबर अल्ट्रा वाइड अँगलसाठी त्याला 12 मेगा पिक्सलचा सेकंडरी कॅमेरा जोडण्यात आल्याची चर्चा आहे. टेलिफोटो लेन्ससह 5 मेगा पिक्सलचा तिसरा कॅमेराही यात समाविष्ट असेल. फोनला 4500 एमएएचची बॅटरी असल्यानं बॅटरी लाईफ चांगली असणार आहे. 

आणखी बातम्या वाचा
मृत्यूनंतर जीमेलचं काय होतंय?

मोबाईलचा इंटरनेट डेटा असा वाचवा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samsung galaxy a91 model got leaked on social media