प्रतीक्षा संपली! Samsung चे तीन नवे फोन लॉंच; वाचा किंमतसह सर्वकाही

samsung galaxy s22 series launched galaxy s22 galaxy s22 plus and galaxy s22 ultra check price details
samsung galaxy s22 series launched galaxy s22 galaxy s22 plus and galaxy s22 ultra check price details

Samsung ने आज 9 फेब्रुवारी रोजी आपल्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये फ्लॅगशिप Galaxy S22 सीरीजचे तीन नवीव स्मार्टफोन लॉन्च केले. गतवर्षीप्रमाणेच सॅमसंगने एस सीरीजचे तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. नवीन लाइनअपमध्ये Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra यांचा समावेश आहे.

स्मार्टफोन्स हाय-एंड स्मार्टफोन्ससाठी लेटेस्ट चिपसेट देण्यात आले आहेत आणि 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले देखील मिळेल. विशेष म्हणजे, यावर्षी सॅमसंगने त्याच्या Galaxy S22+ आणि Galaxy S22 अल्ट्रा मॉडेल्ससाठी चार्जिंगची स्पीड देखील वाढवली आहे, ज्यासाठी 45W वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ मॉडेल मध्ये एकसारखे कॅमेरा सेटअप दिले आहेत, चला तर मग याच्या किंमत आणि फीचर्सची सविस्तर जाणून घेऊया..

Galaxy S22 सीरीज मॉडेलनुसार किमती

- Samsung Galaxy S22 आणि Samsung Galaxy S22+ 8GB+128GB आणि 8GB+256GB व्हेरिएंट ऑप्शन्समध्ये उपलब्ध असतील. तर, हाय-एंड Samsung Galaxy S22 Ultra 8GB+128GB, 12GB+256GB, 12GB+512GB आणि 12GB+1TB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.

- Galaxy S22 ची किंमत $799.99 (अंदाजे 59,900 रुपये) पासून सुरु होत आहे तर Galaxy S22 Plus ची किंमत $999.99 (अंदाजे 74,800 रुपये) पासून सुरु होत आहे. तर Samsung Galaxy S22 Ultra ची सुरुवातीची किंमत $1,199 (सुमारे 89,700 रुपये) आहे. कंपनीचे दावा आहे की Galaxy S22 सीरीजचे स्मार्टफोन 25 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.

samsung galaxy s22 series launched galaxy s22 galaxy s22 plus and galaxy s22 ultra check price details
'भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनू शकतो..'; भाजप नेत्याचा दावा

Samsung Galaxy S22 मध्ये काय खास आहे

- Samsung Galaxy S22 हा Android 12 वर वर चालतो ज्यावर One UI 4.1 देण्यात आले आहे. स्मार्टफोनला गोरिला ग्लास व्हिक्टस+ सह संरक्षित 6.1-इंचाचा फुल-एचडी+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे, तर चेसिस आर्मर्ड अॅल्युमिनियम सुरक्षा मिळते. हा डिस्प्ले ब्ल्यू लाईट कंट्रोलसाठी सॅमसंगच्या आय कम्फर्ट शील्ड आणि 120Hz रीफ्रेश रेटसह येतो जो 10Hz इतका कमी जाऊ शकतो. Samsung Galaxy S22 मध्ये 8GB RAM सोबत ऑक्टा-कोर 4nm चिप दिली आहे.

- Samsung Galaxy S22 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह दिला आहे ज्यामध्ये f/1.8 अपर्चर लेन्स आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेल प्रायमरी ड्युअल पिक्सेल वाइड-एंगल सेन्सर मिळते, f/2.2 अपर्चर लेन्स आणि 120-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा; आणि 3x ऑप्टिकल झूम आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह f/2.4 अपर्चर लेन्ससह 10-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S22 मध्ये f/2.2 अपर्चर लेन्स आणि 80-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह 10-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे.

- Samsung Galaxy S22 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज ऑफर करतो, तर हँडसेटवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट दिले आहेत. सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, बॅरोमीटर, जिओमॅग्नेटिक, गायरो स्कोप, हॉल आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश होतो. स्मार्टफोनमध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. Samsung Galaxy S22 मध्ये 3,700mAh ची बॅटरी दिली आहे जी 25W वर जलद चार्जिंगला सपोर्ट करते, तर स्मार्टफोन 15W वायरलेस चार्जिंग तसेच रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठी वायरलेस पॉवरशेअरला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन्स 146x70.6x7.6mm आणि वजन 168 ग्रॅम आहे.

samsung galaxy s22 series launched galaxy s22 galaxy s22 plus and galaxy s22 ultra check price details
उभ्या गाड्यांनाही आगीचा धोका! Hyundai, Kia ने लाखो कार मागवल्या परत

Samsung Galaxy S22+ मध्ये काय खास आहे

- Samsung Galaxy S22+ Android 12 वर चालतो ज्यावर वर One UI 4.1 दिले आहे. स्मार्टफोनमध्ये ब्लू लाइट कंट्रोलसाठी सॅमसंगच्या आय कम्फर्ट शील्डला सपोर्ट असलेला 6.6-इंचाचा फुल-HD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे आणि 120Hz रिफ्रेश दर 10Hz पर्यंत खाली येऊ शकतो तसेच 1,750 nits ची पीक ब्राइटनेस ऑफर करतो. फोनमध्ये Galaxy S22+ 12GB पर्यंत RAM सह पेअर केलेला ऑक्टा-कोर 4nm SoC पॅक मिळतो.

-Samsung Galaxy S22+ ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो ज्यामध्ये f/2.2 अपर्चर लेन्स आणि 120-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये f/1.8 अपर्चर लेन्स आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी ड्युअल पिक्सेल ऑटोफोकस वाइड-एंगल सेन्सर देखील आहे; आणि 3x ऑप्टिकल झूम, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि f/2.4 अपर्चर लेन्ससह 10-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा देखील मिळतो Samsung Galaxy S22 मध्ये f/2.2 अपर्चर लेन्स आणि 80-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह 10-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.

- Samsung Galaxy S22 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज ऑफर केले जाते तर हँडसेटवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट दिले आहेत. सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, बॅरोमीटर, जिओमॅग्नेटिक, गायरो स्कोप, हॉल आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश होतो. हँडसेट अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. Samsung Galaxy S22 मध्ये 4,500mAh बॅटरी आहे जी 45W वर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, तर स्मार्टफोन 15W वायरलेस चार्जिंग तसेच रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठी वायरलेस पॉवरशेअरला सपोर्ट मिळतो, फोनचे डायमेंशन 157.4x75.8x7.6mm आणि वजन 196 ग्रॅम आहे.

samsung galaxy s22 series launched galaxy s22 galaxy s22 plus and galaxy s22 ultra check price details
सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी PM मोदी म्हणाले, 'माझे कोणतेही विधान..'

Samsung Galaxy S22 Ultra

Samsung Galaxy S22 Ultra हा S-सिरीजमधील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात S Pen फोनच्या बॉडीमध्ये इंटेग्रेट केले आहे, त्याच्या मागील मॉडेलपेक्षा 70 टक्के कमी लेटन्सीसह. हा स्मार्टफोन Android 12 वर दिलेल्या One UI 4.1 वर चालतो. Galaxy S22 Ultra मध्ये मोठा 6.8-इंचाचा Edge QHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रीफ्रेश रेटसह दिला आहे जो 1Hz, आणि 1Hz पर्यंत जातो सोबत 1,750 पीक ब्राइटनेस मिळतो. Galaxy S22 Ultra चा डिस्प्ले देखील कमी लेटन्सीसह S Pen च्या सुधारित क्षमतेस सपोर्ट देण्यासाठी अपडेटेड Wacom टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे. फोन ऑक्टा-कोर 4nm चिपसह सुसज्ज आहे, जो 12GB पर्यंत RAM सह जोडलेला आहे.

- फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy S22 Ultra मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येतो, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर लेन्ससह 108-मेगापिक्सेल वाइड-एंगल कॅमेरा दिली आहे. स्मार्टफोनमध्ये f/2.2 अपर्चर लेन्ससह 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर लेन्ससह 10-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा तसेच 3x ऑप्टिकल झूमसाठी सपोर्ट दिला आहे.

Samsung Galaxy S22 Ultra मध्ये f/4.9 अपर्चर लेन्स आणि 10x ऑप्टिकल झूम असलेला चौथा 10-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा देखील येतो. AI सुपर रिझोल्यूशन तंत्रज्ञानासह 10x ऑप्टिकल झूम आणि 10x डिजिटल झूमसह कॅमेरा त्याच्या मागील मॉडेलप्रमाणे स्पेस झूमला सपोर्ट करतो. Samsung Galaxy S22 Ultra च्या फ्रंटला f/2.2 अपर्चर लेन्ससह 40-मेगापिक्सेल कॅमेरा दिल आहे. सॅमसंगचा दावा आहे की, त्याच्या 2.4um पिक्सेल सेन्सरमुळे. "नायटोग्राफी" कमी प्रकाशात देखील चांगले फोटो घेता येतील.

samsung galaxy s22 series launched galaxy s22 galaxy s22 plus and galaxy s22 ultra check price details
रेडमीचे Note 11S, Note 11 भारतात लॉंच, वाचा किंमत-फीचर्ससह सर्वकाही

कंपनीच्या मते, फोन 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज ऑप्शन्समध्ये विकला जाईल. कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G LTE, UWB, Wi-Fi 6e, ब्लूटूथ v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आले आहेत. सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, बॅरोमीटर, जिओमॅग्नेटिक, गायरो स्कोप, हॉल आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. Samsung Galaxy S22 Ultra मध्ये 5000mAh बॅटरी 45W वर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठी वायरलेस पॉवरशेअरसह 15W वर वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचे डायमेंशन 163.3x77.9x8.9mm आणि वजन 229 ग्रॅम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com