सॅमसंग गॅलेक्सी वॉच 5 ची भारतातील किंमत जाहीर; जाणून घ्या तपशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samsung galaxy watch 5 price revealed for india  Check details here

सॅमसंग गॅलेक्सी वॉच 5 ची भारतातील किंमत जाहीर; जाणून घ्या तपशील

Samsung ने Galaxy Fold 4, Galaxy Flip 4 आणि Galaxy Watch 5 लाँच करून Galaxy Unpacked इव्हेंट 2022 चा समारोप केला. सॅमसंगने इव्हेंट दरम्यान घोषित केलेल्या दोन फोल्डेबल डिव्हाइसेसची किंमत जाहीर केली आहे, परंतु गॅलेक्सी वॉच 5 च्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आता कंपनीने Galaxy Watch 5 ची किंमत जाहीर केली आहे.

Samsung Galaxy Watch 5 ची किंमत

Samsung Galaxy Watch 5 ही चार वेगवेगळय्या केस साईजमध्ये येते. 40mm, 44mm व्हर्जन्सचा समावेश होतो. यामध्ये प्रो व्हेरिएंटचा आकार 45 मिमी आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 40mm केस आकाराच्या ब्लूटूथ व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे, तर LTE व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. हे स्मार्टवॉच ग्रेफाइट, सिल्व्हर आणि पिंक गोल्ड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

44 मिमी केस आकाराच्या ब्लूटूथ व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आणि एलटीई व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे. हे स्मार्टवॉच ग्रेफाइट, सिल्व्हर आणि सॅफायर रंगांमध्ये उपलब्ध आहेत. Galaxy Watch 5 Pro ची किंमत 45mm केस साईजसाठी 44,999 रुपये आणि LTE व्हेरिएंटसाठी 49,999 रुपये आहे. हे स्मार्टवॉच ब्लॅक टायटॅनियम आणि ग्रे टायटॅनियम रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच 16 ऑगस्टपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असतील, ज्यांची डिलिव्हरी 26 ऑगस्टपासून सुरू होईल.

हेही वाचा: Airtel, Jio अन् Vi चे ३६५ दिवसांचे प्लॅन; फ्री डेटासह मिळेल बरंच काही

Samsung Galaxy Watch 5 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Watch 5 चे 44mm मॉडेल स्लिम बेझल्ससह 1.4-इंच AMOLED पॅनेलसह येते, तर 40mm मॉडेल 1.2-इंच AMOLED पॅनेलसह येते. 40mm Galaxy Watch 5 मॉडेल 284mAh बॅटरी पॅकसह तर 44mm व्हेरिएंटमध्ये 410mAh बॅटरी दिली आहे. Samsung Galaxy Watch 5 ही Exynos W920 ड्युअल-कोर 1.18GHz प्रोसेसरसह देण्यात आली आहे, 1.5GB पर्यंत RAM आणि 16GB इंटरनल स्टोरेज यात देण्यात आले आहे.

Galaxy Watch 5 Pro स्लिम बेझल्ससह 1.4-इंचाचा AMOLED डिस्प्लेसह येते. तसेच यात Exynos W920 ड्युअल-कोर 1.18GHz प्रोसेसर 1.5GB पर्यंत RAM आणि 16GB इंटरनल स्टोरेजसह जोडलेला आहे. या घड्याळात 590mAh बॅटरी आहे आणि ती फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, Galaxy Watch 5 मध्ये Bluetooth v5.2, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, NFC, GPS, Glonass, Beidou आणि Galileo सपोर्ट दिला आहे.

हेही वाचा: जिओचे वर्षभर चालाणारे प्रीपेड प्लॅन; मिळेल दररोज 2.5GB डेटा अन् बरंच

Web Title: Samsung Galaxy Watch 5 Price Revealed For India Check Details Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Samsung