Do It All Screen
Do It All Screen

Do It All Screen : स्मार्ट मॉनिटर्स करणार PC आणि TVचे काम; वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना फायदा

नागपूर : सॅमसंग ही भारतातील आघाडीची कंपनी आहे. तसेही सॅमसंग नवीन नवीन फिचर बाजारात घेऊन येत असते. आता दोन स्मार्ट मॉनिटर्स लाँच करून पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. हे स्मार्ट मॉनिटर्स पीसी आणि टीव्ही म्हणून कार्य करणार आहे. तसेही कोरोनामुळे घरून काम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे युजर्सच्या कामात येणार आहे.

Do It All Screen
Online Passport: कोरोनाकाळात पासपोर्ट काढायचा आहे? मग या ऑनलाइन स्टेप्स करा फॉलो

सॅमसंगने बाजारात आणलेले नवीन स्मार्ट मॉनिटर डू-इट ऑल स्क्रीन आहे. ज्यावर वापरकर्ते नेटफ्लिक्स, यूट्यूब, टीव्ही आणि इतर ओटीटी अ‍ॅप्सचा आनंद घेऊ शकतात. याव्यतिरिक्त वापरकर्ते हे मॉनिटर ऑफिस पीसीशी कनेक्ट करू शकतात. कंपनीने भारतात स्मार्ट मॉनिटर एम ५ आणि स्मार्ट मॉनिटर एम ७ स्मार्ट मॉनिटर्स म्हणून सादर केले आहेत. कंपनीचा दावा आहे की हा जगातील पहिला ‘डू-इट-ऑल’ स्मार्ट मॉनिटर आहे.

कोरोनामुळे अनेकांची वर्क फ्रॉम होम आणि शिक्षण सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून हे वर्षभर कायम राहील असे दिसत आहे. तसेही आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. हेच लक्षात घेत सॅमसंगने नवीन स्मार्ट मॉनिटर लॉन्च केले आहे. हा मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ अ‍ॅप्सवर काम करते. यासोबत वापरर्त्याला व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप्सचा देखील लाभ घेता येणार आहे. यामुळे वर्क फ्रॉम होम करण्यासह करमणूक या दोन्हीचा आनंद घेता येणार आहे.

कंपनीने एम ७ आणि सॅमसंग एम ५ या दोन मॉडेल्समध्ये स्मार्ट मॉनिटर बाजारात आणला आहे. एम ७ हे मॉडेल ३२ इंचाच्या आकारात उपलब्ध आहे तर एम ५ हे मॉडेल २३ व ३२ या दोन आकारात उपलब्ध ग्राहकांना मिळणार आहे. एम ५ हे मॉडेल अल्ट्रा एचडी किंवा ४ के रेझोल्यूशनला समर्थन करते. तर एम ५ हे मॉडेल फूल एचडी रेझोल्यूशनला समर्थन करते.

स्मार्ट मॉनिटर मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅप्सवर कार्य करीत असल्यामुळे ग्राहकांना अंतर्भूत (इनबिल्ट) मिळेल. मात्र, वापरकर्त्यांना ऑफिस ३६५ ची सदस्यता घ्यावी लागेल. यानंतर वापरकर्त्याने ऑफिस दस्तऐवज, प्रेजेंटेशन सादर करू शकेल. यासाठी लॅपटॉपची आवश्यकता भासणार नाही. तसेच ओटीटी अ‍ॅप्सचा आनंदही घेता येईल.

Do It All Screen
आता Google Photos वरील डिलीट केलेले फोटोज करा Restore; जाणून घ्या काही स्टेप्स

स्मार्ट मॉनिटरचे वैशिष्ट्ये

बाजारात नवीन आलेले स्मार्ट मॉनिटर मोबाइल आणि पीसी दोघांनाही कनेक्ट होणारे आहे. यात शिकण्याची वैशिष्ट्ये देखील आहेत. स्मार्ट मॉनिटरमध्ये स्मार्टहब असल्याने ओटीटी सामग्री पाहण्यास मदत होणार आहे. यातून तुम्ही डेस्कटॉपचा अनुभव देखील घेऊ शकता.

लागतील इतके पैसे

स्मार्ट मॉनिटर एम ५ची किंमत २८,००० रुपये आहे. परंतु, मर्यादित काळासाठी कंपनी हे डिव्हाइस २१,९९९ रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. तसेच सॅमसंग स्मार्ट मॉनिटर एम ७ ची किंमत ५७,००० रुपये आहे. परंतु, वापरकर्ते ते केवळ ३६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com