Saudi Arabia: सौदीअरब उभारणार स्वप्नातली दुनिया; ना रस्ता ना कार, याचा भारतासाठी फायदा होणार!

सौदीअरबियाने नेक्स्ट मेगा प्रोजेक्टची घोषणा केली आहे. हा खास ड्रीम प्रोजेक्ट बनला आहे हा प्रकल्प अतिशय खास आणि सुंदर आहे. या प्रकल्पाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Saudi Arabia  announced next mega project special dream
Saudi Arabia announced next mega project special dreamsakal

Saudi Arabia Mega Project: सौदीअरबचा राजा आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान या मेगा प्रोजेक्टच्या माध्यमातून 2030 पर्यंत राजधानी रियाधचा आकार आणि येथे राहणारी लोकसंख्या दुप्पट करायची आहे. त्यासाठी त्यांनी देशाची तिजोरी खुली केली आहे.असं म्हाणाले.

सौदीअरबियाने नेक्स्ट मेगा प्रोजेक्टची घोषणा केली आहे. हा खास ड्रीम प्रोजेक्ट बनला आहे हा प्रकल्प अतिशय खास आणि सुंदर आहे. या प्रकल्पाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्याची इमारत अतिशय सुंदर आहे. त्यात ना रस्ते आहेत ना गाड्या. ड्रोनने सुसज्ज असलेली ही इमारत अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतआहे. अरब न्यूजच्या वृत्तानुसार ही इमारत भविष्याचा वेध घेऊन बांधण्यात येत आहे.

या प्रकल्पात तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ Reddit वर Damnthatsinteresting नावाच्या युजर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. मुकाब असे या प्रकल्पाचे नाव आहे. सूर्य आणि वाऱ्यातून बाहेर पडणारी ऊर्जा विजेसाठी वापरली जाईल. स्वतंत्र वीज प्रकल्प उभारले जाणार नाहीत.

ही इमारत क्यूबच्या आकारात असेल, जी न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा 20 पट मोठी असेल. या इमारतीत म्युझियम, थिएटर असेल. 80 ठिकाणी मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या इमारतीत 104,000 फ्लॅट्स, 9,000 हॉटेल रूम आणि ऑफिस स्पेस असेल. या सगळ्याशिवाय अनेक कम्युनिटी सेंटर्स असतील.

Saudi Arabia  announced next mega project special dream
Pune By Poll Election: लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी कुठले औषध मागवलं; पवारांना भाजप नेत्याचा सवाल

सौदीचे राजकुमार आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांना या मेगा प्रोजेक्टद्वारे राजधानी रियाधचा आकार आणि येथे राहणारी लोकसंख्या 2030 पर्यंत दुप्पट करण्याची इच्छा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोहम्मद बिन सलमान रियाधच्या डाउनटाउन परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पासाठी ते सुमारे 800 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.

Saudi Arabia  announced next mega project special dream
Mumbai : शिवकालीन शस्त्र व दुर्मिळ नाणी प्रदर्शन

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळापासून 20 मिनिटांचे अंतर असेल. पाहिलं तर हे खूप सुंदर ठिकाण आहे. हा प्रकल्प 2017 मध्ये सांगितला होता. अपेक्षेनुसार हा प्रकल्प 2030 मध्ये तयार होईल.

हे शहर भारतासाठी खूप खास असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेगा सिटी प्रकल्पातून 3.34 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. सध्या या देशात २५ लाख भारतीय राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com