वीजेचं बिल होईल अर्ध्यापेक्षा कमी! फक्त घरातील या २ डिवाईसमध्ये करा बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Save your electricity bill by these tricks

वीजेचं बिल होईल अर्ध्यापेक्षा कमी! फक्त घरातील या २ डिवाईसमध्ये करा बदल

आधुनिकतेच्या युगात आपल्या घरात आता अनेक इलेक्ट्रीक साधनांचा समावेश झालाय. मात्र महिन्याच्या शेवटी येणारं वीजेचं बिल बघून आपण सगळेच थक्क होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेने आपल्या घरातील फॅन,कूलर, एसी जास्त चालत असते. वीजेचं बील कमी करण्यासाठीच्या काही महत्वाच्या ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या घरातील निम्म वीजेचं बिल तुम्ही वाचवू शकता. (Save your electricity bill by these tricks)

तुमच्या घरातील एसीमुळे वीजेचं बिल जास्त येत असतं. मात्र काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सहजरित्या वीजेचं बिल वाचवू शकता. टाटा पावरच्या मते गर्मीच्या काळात एसी चालवताना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सतत एसीचं तापमान कमी जास्त केल्याने वीजेचे युनिट जास्त जळतात. असे न करता तुम्ही एसीला एकाच स्पीडवर कायम ठेवा. वीज वाचवण्यासाठी एसीला २६ डिग्रीवर सेट करून ठेवा. यामुळे तुमच्या वीजेची बचत होईल.

स्विच कायम बंद ठेवा

घरात काम नसताना कुठलाही स्विच चालू ठेवू नका. स्विच ऑन ठेवल्याने वीज जास्त जळते. उदा. तुम्ही टीव्ही, वॉशिंग मशिन,मायक्रोवेवचा (Electric Gadgets) उपयोग केल्यानंतर त्याला फक्त रिमोटने बंद करत असाल आणि स्विच चालू ठेवत असाल तरी वीज जळणं सुरू असतं. म्हणून नेहमी काम झाले की सगळे स्विच बंद आहेत याची काळजी घ्यावी.