स्कूटर खरेदीचा विचार करताय? फेब्रुवारीत लॉंच झालेत हे दमदार स्कूटर

Honda Vario 160
Honda Vario 160

देशात पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे पसंत करत आहेत. त्यासाठी देशात अनेक वाहनांचे पर्याय देखील उपलब्ध आहेक. 2022 मध्ये एकापेक्षा एक दमदार स्कूटर लॉंचसाठी सज्ज आहेत. या दरम्यान फेब्रुवारीमध्ये दुचाकी निर्मात्या कंपन्यांनी 5 नवीन स्कूटर लाँच केले आहेत. जर तुम्ही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर ही यादी नक्की वाचा, जिथे तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय देखील पाहायला मिळेल.

1- वार्डविझार्ड

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटीने दोन नवीन हाय-स्पीड स्कूटर वुल्फ+ आणि नानू+ (वुल्फ+ आणि नानू+) आणि फ्लीट मॅनेजमेंट इलेक्ट्रिक स्कूटर डेल गो लाँच केले आहेत. कंपनीचे Wolf+ शहराच्या बाहेरच्या भागात ड्रायव्हिंगसाठी टूरिंग डिझाइनसह येते. दुसरीकडे, Gen Next Nanu+ (Nanu+) चे डिझाईन हे तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे, जी एक अतिशय स्टायलिश स्कूटर आहे.

दोन्ही स्कूटर 1500W मोटरसह येतात जी 20Nm टॉर्क जनरेट करतात आणि हे स्कूटर 55 किमी प्रति तास टॉप स्पीड देतात. दोन्ही स्कूटरची बॅटरी 60V35Ah रेट केलेली आहे. एका चार्जवर 100 किमीचा पल्ला गाठण्याचा कंपनीचा दावा आहे.

2- क्रेयॉन मोटर्स

स्टार्टअप इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी क्रेयॉन मोटर्सने मंगळवारी स्नो प्लस ही कमी स्पीडची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. क्रेयॉन स्नो प्लसची किंमत रु. 64,000 पासून सुरू होते . ही ई-स्कूटर कमी अंतरासाठी स्कूटर शोधत असलेल्या ग्राहकांसाठी परफेक्ट आहे . ही खास कमी अंतरावरील प्रवाशांसाठी डिझाइन केली गेली आहे, ज्याचा वेग फक्त 25 किमी प्रतितास आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटर 250-वॅट मोटरसह येते.

Honda Vario 160
Jio चे 365 दिवसांचे प्लॅन, मिळते फ्री कॉलिंग, दररोज 3GB पर्यंत डेटा

3- AMO इलेक्ट्रिक बाइक्स

AMO इलेक्ट्रिक बाइक्स, भारतातील सर्वात वेगाने वाढणारा इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड आहे, त्यांनी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर/बाईक जॉन्टी प्लसचे नुकतेच अनावरण केले आहे. ही इलेक्ट्रिक बाइक स्टाईल, परफॉर्मन्स आणि सुरक्षितता यांचा उत्तम मिलाफ आहे. दुसरीकडे, त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची किंमत 1,10,460 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

4- Honda Vario 160

प्रसिध्द दुचाकी बनवणारी कंपनी Honda ने आपली Vario 160cc ही स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने ते इंडोनेशियन मार्केटमध्ये दोन ट्रिममध्ये ती लॉन्च केले आहे. या स्कूटरमध्ये सीबीएस आणि ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आले आहे. Honda Vario 125 आणि Honda Vario 150 इंडोनेशियन मार्केटमध्ये खूप पसंत केले जात आहे. व्हॅरिओ सीरीज होंडाने 2006 मध्ये लॉन्च केली होती, जी 2022 मध्ये पुन्हा अपडेट केली गेली. हा देखील बेस्ट पर्याय ठरु शकतो.

किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Honda Vario 160cc CBS मॉडेलची किंमत RP 25,800,000 (अंदाजे 1.34 लाख रुपये) आहे. त्याच वेळी, ड्युअल चॅनल ABS ची किंमत RP 28,500,000 (सुमारे 1.48 लाख रुपये) आहे.

Honda Vario 160
Tata Nexon चे 4 नवीन व्हेरिएंट लॉंच, मिळणार हे मस्त फीचर्स, पाहा किंमत

5- Kawasaki Z650 RS

Kawasaki Z650 RS जागतिक स्तरावर सादर करण्यात आले आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीने आपली आलिशान मोटारसायकल Kawasaki Z650 RS 50 वी एनिव्हर्सरी एडीशन भारतीय बाजारात लॉन्च केली. नवीन स्पेशल एडिशन मॉडेलची किंमत 6.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी भारतात आधीपासून विक्रीसाठी असलेल्या स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 5,000 रुपये अधिक महाग आहे.

Honda Vario 160
युक्रेनमध्ये मुलगा गमावलेले वडील म्हणाले, '९७ टक्के गुण असूनही इथे…'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com