
या गोष्टी गुगलवर शोधण्याची चूक कधीच करू नका... नाहीतर जाल तुरुंगात
मुंबई : एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण सर्वात आधी Googleवर शोधतो. तेथे सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती उपलब्ध असते. तरूण वयात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरेही गुगलवरच शोधली जातात; मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या गुगलवर शोधण्याची चूक कधीही करू नये. असे केल्यास ही केवळ चूक ठरत नाही तर गुन्हा ठरतो.
हेही वाचा: ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला 4 वर्षांचा तुरुंगवास
child pornography
लहान मुलांशी संबंधित अश्लील आशय गुगलवर शोधणे हा गुन्हा आहे. यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. या कायद्यानुसार POSCO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ५ ते ७ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद यासाठी आहे.
हेही वाचा: अहमदनगर : लष्कराचा बॉम्ब आणला घरी
बॉम्ब कसा बनवावा ?
या प्रश्नाचं उत्तर गुगलकडे मागितलंत तर अडचणीत याल. असे केल्याने तुम्ही सुरक्षायंत्रणांच्या रडारवर याल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
हेही वाचा: भारतात होणारे 67 टक्के गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू
गर्भपात
गर्भपाताची माहिती गुगलवर शोधणे हा गुन्हा आहे. गर्भपात कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या कालावधीत केला जावा याबाबतचे कठोर कायदे भारतात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे गर्भपाताची माहिती गुगलवर शोधणे हाही गुन्हा ठरवण्यात आला आहे.
या तीन गोष्टी गुगलवर शोधण्याची चूक गुगल वापरकर्त्यांनी कधीही करू नये. या विषयांवर सकारात्मक कृती करण्याच्या दृष्टीने काही अभ्यास करण्याची इच्छा असल्यास संबंधित क्षेत्रांतील जबाबदार तज्ज्ञांकडून ती माहिती मिळवणे श्रेयस्कर ठरते. यात कायद्याची कोणतीही अडचण नाही.
Web Title: Searching These Things Will Be An Offense Bomb Making Abortion Child Pornography
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..