फक्त ३१ हजारात खरेदी करा Yamaha Fascino 125, कंपनी देतेय वाॅरंटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yamaha Fascino 125
फक्त ३१ हजारात खरेदी करा Yamaha Fascino 125, कंपनी देतेय वाॅरंटी

फक्त ३१ हजारात खरेदी करा Yamaha Fascino 125, कंपनी देतेय वाॅरंटी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टु व्हिलर सेक्टरमध्ये मायलेज देणाऱ्या स्कूटरपासून आकर्षक स्टाईल असलेल्या स्कूटरची संख्या मोठी आहे. यात आज आम्ही यामाहा फसीनो १२५ (Yamaha Fascino 125) विषयी बोलणार आहोत. मायलेज देण्याबरोबरच आकर्षक डिझाईन असलेली ही स्कूटर आहे. तुम्ही जर ही स्कूटर शोरुममधून खरेदी केल्यास त्यासाठी ७२ हजार ३० रुपयांपासून ७८ हजार ५३० रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागेल. मात्र तुमच्या जवळ इतके मोठे बजेट नसेल तर येथे जाणून घ्या ही स्कूटर निम्म्यापेक्षा कमी किंमतीत घेता येणाऱ्या ऑफरविषयी...

यामाहा फसीनो १२५ वर ऑफर देऊ केले आहे सेकंड हँड टु-व्हिलर खरेदी-विक्री करणारी वेबसाईट BIKES24ने. तिने आपल्या साईटवर या स्कूटरला लिस्ट केले आहे. तिची किंमत ठेवली आहे ३१ हजार रुपये. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या स्कूटरचे माॅडल २०१७ चे आहे. तिची ऑनरशीप फर्स्ट आहे. ही स्कूटर आतापर्यंत २६ हजार ९७१ किलोमीटर धावली आहे. तिचे रजिस्ट्रेशन दिल्लीचे डीएल ०८ आरटीओत नोंदविण्यात आली आहे.

हेही वाचा: Mercedes ची हॅचबॅक कार आहे देशात सर्वात वेगवान, जाणून घ्या फिचर्स

ही स्कूटर खरेदी केल्यावर कंपनीच्या वतीने काही अटींसह एक वर्षाची वाॅरंटी आणि सात दिवसात मनी बॅक गॅरंटी दिले जात आहे. या मनी बॅक गॅरंटीनुसार ही स्कूटर खरेदी केल्यावर सात दिवसांच्या आत तिच्यात काही बिघाड झाल्यास किंवा ती तुम्हाला न आवडल्यास कंपनीला परत करता येऊ शकेल. परत केल्यानंतर कंपनी काही न विचारता कोणतीही काटछाट न करता तुमचे पूर्ण पेमेंट परत करेल. ऑफरविषयी जाणून घेतल्यानंतर आता तिच्या फिचर्स आणि स्पेसिफिकेशनविषयी जाणून घेऊ....

या स्कूटरमध्ये देण्यात आले आहे सिंगल सिलिंडरचे १२५ सीसीचे इंजिन, जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२ पीएसचे पाॅवर आणि १०.३ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते आणि या स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे. स्कूटरचे ब्रेकिंग सिस्टिमबाबत बोलाल तर तिचे फ्रंट व्हिलमध्ये ब्रेक आणि रेअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेकचे काॅम्बिनेशन दिले आहे.

loading image
go to top